Sonalee Kulkarni Dance: 'येऊ कशी प्रिया...' ९० च्या दशकातील गाण्यावर थिरकली अप्सरा, हूक स्टेप्सने वेधले लक्ष

Sonalee Kulkarni Dance Video: मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमी चर्चेत असते. सोनाली कुलकर्णीने नुकताच 'येऊ कशी प्रिया' गाण्यावर डान्स केला आहे.
Sonalee Kulkarni Dance Video
Sonalee Kulkarni Dance VideoSaam Tv

मराठी चित्रपटसृष्टीतील सोनाली कुलकर्णी लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोनाली अभिनेत्रीसोबतच उत्तम नृत्यांगणादेखील आहे. सोनाली कुलकर्ण सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती नेहमी नवीन व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सोनालीने नुकताच एक डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

सोनालीच्या अॅक्टिंगचे आणि डान्सचे लाखो चाहते आहेत. सोनालीने नुकताच मराठीतील एका जुन्या गाण्यावर डान्स केला आहे. याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सोनालीने येऊ कशी प्रिया या गाण्यावर हटके डान्स केला आहे. सोनालीने नृत्यदिग्दर्शत आशिष पाटीलसोबत डान्स केला आहे. सोनालीने हटके स्टेप्स करत डान्स केला आहे. सोनालीने हा डान्स एक इव्हेंटमध्ये केला आहे. सोनालीने या व्हिडिओ खास कॅप्शन दिले आहे. स्टेजवर डान्स करण्यापूर्वी कोरिओग्राफरसोबत व्हॅनिटी व्हॅनमध्ये डान्स, असं कॅप्शन तिने दिले आहे. सोनालीचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे.

Sonalee Kulkarni Dance Video
Radhika Merchent Pre Wedding Look : अंबानींची सौंदर्यवती सूनबाई ! राधिका मर्चंटच्या प्री- वेडिंग लूकने वेधलं लक्ष

सोनालीच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अप्सराचा ९०च्या दशकातील गाण्यावर डान्स, अप्सरा खरंच खूप सुंदर दिसत आहे, अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत. 'येऊ कशी प्रिया' हे गाणं ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी गायले आहे.

Sonalee Kulkarni Dance Video
Kirron Kher Birthday : संकटांनी पाठ सोडली नाही, तरीही नेहमी चेहऱ्यावर हास्य; 'किरण खेर'चा अंगावर काटे आणणारा प्रवास, एकदा वाचाच

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com