Sridevi Prasanna Movie: चहा घेणार की कॉफी?, सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकरला 'श्रीदेवी प्रसन्न'

Saie Tamhankar And Siddharth Chandekar: टिप्स फिल्म्स प्रस्तुत आणि कुमार तौरानी यांची निर्मिती असलेला 'श्रीदेवी प्रसन्न' या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले.
Saie Tamhankar And Siddharth Chandekar
Saie Tamhankar And Siddharth ChandekarSaam Tv
Published On

Sridevi Prasanna Motion Poster Out:

मराठी सिनेसृ्ष्टीची 'बिधनास्त गर्ल' म्हणून ओळखली जाणारी सई ताम्हणकर (Saie Tamhankar) आणि 'चॉकलेट बॉय' अर्थात अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) लवकरच रुपरे पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. नव्या वर्षात सिद्धार्थ आणि सईची एक नवी लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहायाला मिळणार आहे. सिद्धार्थ आणि सई 'श्रीदेवी प्रसन्न'च्या (Sridevi Prasanna Movie) माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांचा हा चित्रपट पुढच्या वर्षी २ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकताच दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना सरप्राईज दिले.

टिप्स फिल्म्स प्रस्तुत आणि कुमार तौरानी यांची निर्मिती असलेला 'श्रीदेवी प्रसन्न' या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले. या चित्रपटातून सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर अशी भन्नाट आणि बेमिसाल जोडी प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. आजवर अनेक हिट चित्रपट देणारे हे दोन्ही कलाकार एकत्र येऊन एक वेगळीच प्रेमकहाणी रुपेरी पडद्यावर फुलवणार आहेत. यानिमित्ताने नव्या वर्षात, एक नवी आणि आगळी-वेगळी लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या लाडक्या जोडीसह हा चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकता.

या चित्रपटामध्ये सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिकेसह सुलभा आर्या, सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, संजय मोने, वंदना सरदेसाई, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, रमाकांत डायमा, शुभांगी गोखले, पाहुल पेठे, पल्लवी परांजपे, पूजा वांखेडे, सिद्धार्थ महाशब्दे, जियांश पराडे अशी जबरदस्त स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. श्रीदेवी आणि प्रसन्न यांची हा खास लव्हस्टोरी सर्वांच्या भेटीला येणार आहे. सई आणि सिद्धार्थच्या चाहत्यांसाठी ही खूपच आनंदाची बाब आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून त्यांना प्रचंड आनंद झाला आहे.

Saie Tamhankar And Siddharth Chandekar
Ira Khan And Nupur Shikhare Wedding: आयरा खान- नुपूर शिखरेच्या घरी लगीनघाई, प्री-वेडिंग फंक्शनला सुरूवात; फोटो व्हायरल

सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. तिने कॅप्शनमध्ये 'चहा घेणार की कॉफी? वेगळेपणात आपलंपण शोधण्याचा हा प्रवास सुरु करूया. येतोय #SrideviPrasanna २ फेब्रुवारी २०२४ पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.' असं लिहिलं आहे. सई आणि सिद्धार्थच्या या पोस्टला त्यांच्या चाहत्यांनी खूपच चांगली पसंती दिली आहे. दरम्यान, या चित्रपटाचे लेखन अदिती मोघे यांनी केले असून विशाल विमल मोढवे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर अमित राज यांनी संगीत दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

Saie Tamhankar And Siddharth Chandekar
Chamatkar Song: अंधाराला सापडू दे उजेडाचं दार रे…, 'पंचक'मधील भावनिक गाणं 'चमत्कार' प्रेक्षकांच्या भेटीला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com