Hemangi Kavi: शाहरुख खानचा 'पठान' चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली दमदार कमाई केली आहे. शाहरुखचा हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. पहिल्या तीन दिवसातच 'पठान'ने बॉक्स ऑफिसवर जगभरात 300 कोटींचा टप्पा ओलांडला. जरी ही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली असली तरी, चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी ट्रोलर्सकडून केली जात आहे. चित्रपटाची भुरळ अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसह मराठी सेलिब्रिटींनाही चित्रपटाची पडली आहे.
मराठी अभिनेत्री हेमांगी कवीला ही शाहरुखच्या पठानची भुरळ पडली आहे. नुकताच तिने सोशल मीडियावर पोस्ट करत शाहरुखवर होणाऱ्या टीकेवर भाष्य केलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत हेमांगी म्हणते, "तो कसा दिसतो, त्याचा धर्म काय, कसा बोलतो, अभिनेता म्हणावं का याला वगैरे वगैरे बोलणाऱ्यांनो तुम्ही आता खरचं बंद पडा! अनेक वर्षांपासून ही चर्चा होत आली आहे. पण आता ही थांबवुया... काय? त्याच्या धर्मामुळे, हिरो लुक नसल्यामुळे त्याचा पराकोटीचा द्वेष करणारे आपण सगळ्यांनीच पाहिले आहेत. मी त्याची फॅन आहे कळल्यावर अनेकांनी मला अनफॉलो केलं याहून बालिश प्रकार मी पाहिला नाही."
ती पुढे म्हणते, "असो. मला वाटतं या द्वेषाचं मुळ कारण हे लोक अनाहुतपणे स्वतःहाला त्याच्याशी compare करत असावेत. हा सगळ्या बाबतीत आपल्यापेक्षा डावा असून ही इतका यशस्वी कसा? आणि आता तर या वयातही!!! सिनेमा प्रदर्शनासाठी लागणारे सगळे ठोकताळे बाजूला सारून घरबसल्या घरी बसणाऱ्या लोकांना थिएटरमध्ये आणणे हे हाच करू जाणे! स्वतःहाच्या मुलाच्या बाबतीत त्याने दाखवलेला संयम (भल्या भल्यांनाही जमला नसता) त्याला या वयात जरा जास्तच आकर्षक बनवतो."
हेमांगी एवढ्यातच थांबली नाही. ती पुढे म्हणतो, "उफ्फ अपन तो पहलेसे लुटे हुए थे, अब तो पुरे बरबाद हो गए! पन्नाशी नंतर रिटायरमेंटचे plans करून मोकळे झालेल्यांनो द्वेष करण्यापेक्षा त्याच्याकडून काहीतरी शिकूया! तुमच्या ५७ व्या वर्षी जर तुम्ही २०-२२ वयाच्या मुला-मुलींना नाचवू शकत असाल, वेड लावू शकत असाल तर पुढे बोला! बाकी… झूमे जो पठान मेरी जान, महफ़िल ही लूट जाए!"
हेमांगीच्या या पोस्टवरुन नेटकरी तिला बरेच ट्रोल करीत आहे. या पोस्टवर कमेंट द्वारे ट्रोलर म्हणतात, पाकिस्तानला मदत करणाऱ्याचं एवढं कौतुक? भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या जवानांचा तरी विचार करायचा, आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करू नका, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, आपल्या मराठी सिनेमांचं असं कौतुक केलं तर बरं होईल, अशा कमेंट्स करत अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करत प्रत्युत्तर दिले.
शाहरुखचे चाहते 'पठान' सिनेमाचं कौतुक करत असले तरी नेटकरी शाहरुखला प्रचंड ट्रोल करत आहेत. पण तरीही वादाच्या भोवऱ्यात अडकलेला 'पठान' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ कायम घालत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.