Apurva Nemlekar: अपूर्वा प्रियकराच्या शोधात; सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टची चर्चा

सोशल मीडियावर अपूर्वा नेमळेकर बरीच सक्रीय असून ती आपल्या स्पष्ट आणि रोखठोक वक्तव्याने कायमच प्रकाशझोतात कायम राहिली आहे
Apurva Nemlekar
Apurva NemlekarInstagram/ @apurvanemlekarofficial

Apurva Nemlekar: अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सध्या बिग बॉसमुळे सर्वाधिक चर्चेत आली आहे. तिने आजवर बिग बॉसच्या घरात चांगलाच राडा घातलाय. त्यामुळे ती बिग बॉसच्या घरातही आणि घराच्या बाहेरही बरीच चर्चेत दिसते. तिने याआधी झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतून प्रेक्षकांच्या समोर आली होती. त्यात तिने शेवंता नावाचे पात्र साकारले होते.

Apurva Nemlekar
Shahrukh Khan: काल एअरपोर्टवर शाहरुख सोबत नक्की काय घडलं? वाचा सविस्तर...

बिग बॉसमुळे सर्वाधिक प्रसिद्ध आणि चांगलीच चर्चेत असलेली अपूर्वा खासगी आयुष्यातील एका किस्स्याने पुन्हा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर अपूर्वा नेमळेकर बरीच सक्रीय असून ती आपल्या स्पष्ट आणि रोखठोक वक्तव्याने कायमच प्रकाशझोतात कायम राहिली आहे. ती सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी फोटोज आणि काही व्हिडिओज शेअर करत असते.

Apurva Nemlekar
Bigg Boss Marathi 4: कॉलेजच्या दुनियादारीत रंगणार चावडी, मांजरेकरांच्या हिटलिस्टवर आली क्लासमेटची पोरं सारी

काही महिन्यांपूर्वी अपूर्वाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल काही खुलासे केले होते. यात तिने तिच्या सिंगल असण्याबद्दलही त्यावेळी भाष्य केले होते. अपूर्वाने इंस्टाग्रामवर काही महिन्यांपूर्वी 'AskMeAnything' नावाचे क्विझ ठेवले होते. त्यात तिला चाहत्यांनी बरेच प्रश्न ही विचारले होते. त्यावर तिने मनमोकळ्यापणाने उत्तरही दिली.

Apurva Nemlekar
Tujhyat Jeev Rangala : अभिनेत्री कल्याणी कुरुळे-जाधव हिचं कोल्हापूरात अपघाती निधन; आठवड्याभरापूर्वीच साजरा केला होता वाढदिवस

एका चाहत्याने विचारले की, 'तू सिंगल आहेस की तुझं लग्न झालंय?' त्यावर तिने स्पष्ट उत्तर दिले की, "मी सध्या तरी सिंगल आहे. त्यात मी आनंदी आहे. पण तरीही मी माझ्या प्रिय व्यक्तीची वाट बघतेय." तिच्या प्रश्नाची आणि उत्तराची सर्वत्रच चर्चा होत आहे.

अपूर्वाची सिनेसृष्टीत 'आभास हा' या मालिकेतून मालिकेतून झाली होती. सोबतच 'ती एका पेक्षा एक जोडीचा मामला' या डान्स रिअॅलिटी शो मध्ये दिसली होती. सर्वधिक प्रकाशझोतात अपूर्वा 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेमुळे आली होती.

Apurva Post
Apurva PostInstagram/ @apurvanemlekarofficial

या मालिकेचे एकूण दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या दोन्हीही भागात अपूर्वा बरीच चर्चेत होती. अपूर्वाने 'आराधना' या मालिकेतही काम केले होते. त्याचसोबत 'तू माझा सांगाती' मध्येही तिने उत्तम भूमिका साकारली होती. पणाने उत्तरे दिले होते. तिला काही चाहत्यांनी तिच्या खासगी आयुष्यावरही प्रश्न विचारले होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com