Bigg Boss Marathi 4 Latest Update: बिग बॉसच्या घरात त्यांच्या 'ऑल इज वेल' या थीमप्रमाणे काहीही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. सध्या हिंदी बिग बॉसप्रमाणे मराठी बिग बॉसच्या प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस घरातील प्रत्येक टास्कमध्ये नवनवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत.
मराठी बिग बॉसच्या घरात सर्व स्पर्धक एकत्र राहून जवळजवळ ४० दिवस झाले आहेत. प्रत्येक स्पर्धकांमधील नाते आता मैत्रीपूर्ण होताना दिसून येत आहेत. जशी मैत्री प्रत्येकाची दिसून येत आहे, तसेच त्यांच्यात वाद-विवादही होताना दिसून येत आहे. त्यामुळे सर्वाधिक चर्चा होताना दिसून येत आहे.
मराठी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक टीआरपी असलेला कार्यक्रम म्हणून त्याची ओळख आहे. प्रत्येक आठवड्यात काही तरी नवीन रंजक ट्विस्ट आपल्याला बिग बॉसच्या घरात दिसत असतो. स्पर्धकांसोबत प्रेक्षकांनाही आवडता दिवस म्हणजे चावडीचा. शनिवारी महेश मांजरेकर चावडीवर स्पर्धकांसमोर येत त्यांना मार्गदर्शन करत असतात. आठवड्याभरात केलेल्या चांगल्या आणि वाईट गोष्टींची महेश मांजरेकर शाळा घेत असतात.
आज होणाऱ्या चावडीवर महेश मांजरेकर कोणत्या स्पर्धकाची स्तुती करणार आणि कोणत्या खेळाडूवर टिकेचे बाण सोडणार हे आजच्या भागातच कळणार आहे. सध्या सोशल मीडियावर बिग बॉसच्या चावडीवरील एक प्रोमो चांगलाच व्हायरल होत आहे.
तो प्रोमो कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये महेश मांजरेकर व्हिडिओमध्ये बोलत आहे की, या आठवड्यात कॉलेजमधील दुनियादारी पाहायला मिळाली. काही जणांची मैत्री हमरीतुमरीवर आली तर काही जणांची मैत्री सच्चे यार म्हणून समोर आले.
त्यामुळे आजच्या चावडीवर बरेच स्पर्धक हिटलिस्टवर आहेत. चावडीवर कोणकोणत्या स्पर्धकांची महेश मांजरेकर शाळा घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सध्या बिग बॉसच्या घरात प्रत्येक दिवसाला ट्विस्ट, टास्कमध्ये ट्विस्ट, स्पर्धकांच्या खेळण्यात सुद्धा ट्विस्ट दिसत आहे. महेश मांजरेकर आठवड्याभरात झालेल्या सगळ्या गोष्टीत स्पर्धकांना वठणीवर आणण्याचे काम आज करताना दिसणार आहेत.
गेल्या ४० दिवसांमध्ये एकूण ४ स्पर्धकांना बिग बॉसच्या घरातून बाहेर जावे लागले होते. तर एका स्पर्धकाला वाईल्ड कार्डाच्या रुपाने एन्ट्री मिळाली होती. आतापर्यंत निखिल राजेशिर्के, मेघा घाडगे, योगेश जाधव, त्रिशूल मराठे यांना बिग बॉसच्या घरातून बाहेर जावे लागले. या चावडीवरुन कोणत्या स्पर्धकाला घराच्या बाहेर जावे लागते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.