Drishyam 2: अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला 'दृश्यम' चित्रपट २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता, यावर्षी चित्रपटाचा पुढील भाग म्हणजे 'दृश्यम २' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या १८ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून चित्रपटातील अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मिळणे अद्याप तरी बाकीच आहेत. चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनातील उत्सुकता वाढवण्यासाठी टीमने अनेक वेळा महत्वाच्या अपडेट्स दिल्या आहेत.
आता पुन्हा एकदा 'दृश्यम २' संबंधित आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. एसीपी प्रद्युमन यांच्या सीआयडी टीमची 'दृश्यम २' मध्ये एंट्री होणार आहे. नुकतेच सीआयडी परत एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा परिस्थितीतच अजयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामध्ये सीआयडी फेम विजय साळगावकर हे चित्रपटातील एका केसचा खुलासा करताना दिसणार आहेत.
अजय देवगणने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो एका टेबलासमोर बसलेला दिसत आहे. त्याच्यासमोर सीआयडीची टीमही दिसत आहे. ते काहीसे त्रासलेले दिसत आहेत असून 2 आणि 3 ऑक्टोबरला काय झाले? त्या घटनेचे गुढ उकलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
यात अजय देवगण एका वेगळ्याच हावभावात दिसत आहे. यानंतर तो स्वॅगसोबत काळा गॉगल घातलेला दिसत आहे. अजयने या व्हिडीओसोबत कॅप्शन दिले आहे की, 'केस पुन्हा सुरु झाली नाही तेच त्यांची चौकशी सुरू झाली.'
एसीपी प्रद्युमन यांची टीम चित्रपटातील केसच्या विशेष तपासाचा भाग असेल. ही टीम आय.जी मीराला मदत करताना दिसणार आहे. परंतु ही सीआयडीची टीम चित्रपटात जास्त वेळ दिसणार नाहीत, तर या चित्रपटात ते पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. या फोटोत एसीपी प्रद्युमन, इन्स्पेक्टर अभिजीत आणि इन्स्पेक्टर दयासोबत अजय एका चौकशी कक्षात दिसत आहे.
2018 मध्ये बंद पडलेल्या 'सीआयडी' या टीव्ही शोने 21 वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर या शोचे पुनरागमन होत असल्याची बातमी आल्यापासून प्रेक्षकांचा उत्साह वाढला आहे. 2018 मध्ये हा शो बंद झाला होता पण प्रेक्षक या शोला खूपच मिस करत होते. आता शोचे मुख्य पात्र एसीपी प्रद्युम्न म्हणजेच शिवाजी साटम यांनी शोमध्ये पुनरागमन केल्याची पुष्टी केली आहे. अशा परिस्थितीत अजय देवगणसोबतच्या टीमचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.