Anagha Atul: हे नक्की चाललंय काय?, अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेत्रीची संतप्त पोस्ट चर्चेत

Abhishek Ghosalkar Case: पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांची लेक अभिनेत्री अनघा अतुल (Anagha Atul) ही नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रिय असणारी अनघा नेहमी स्पष्टपणे आपले मत मांडत असते.
Anagha Atul On Abhishek Ghosalkar
Anagha Atul On Abhishek GhosalkarSaam Tv
Published On

Anagha Atul On Abhishek Ghosalkar:

माजी आमदार विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांचे पुत्र आणि शिवेसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. बोरीवलीच्या आयसी कॉलनीमध्ये गुरुवारी रात्री ही घटना घडली. या घटनेमुळे सर्वांना मोठा धक्का बसला. या घटनेमुळे संपूर्ण मुंबईच नाही तर महाराष्ट्र हादरला आहे. फेसबुक लाइव्ह सुरू असताना अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्यात आल्या. या घटनेनंतर सगळीकडे दहशतीचे वातावरण आहे. सर्वसानान्यांपासून ते अनेक जण सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रकरणावर आपले मत व्यक्त केले आहे. अशामध्ये मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे.

पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांची लेक अभिनेत्री अनघा अतुल (Anagha Atul) ही नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रिय असणारी अनघा नेहमी स्पष्टपणे आपले मत मांडत असते. बोरीवलीमध्ये घडलेल्या अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी देखील तिने सोशल मीडियावर पोस्ट करत संतपा व्यक्त केला आहे. अनघाने अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा व्हिडीओ आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आपल्या आजूबाजूला हे नक्की चाललंय काय? अशाप्रकारच्या बातम्या अस्वस्थ करतात. आपण किती दुर्लक्ष करायचं?'

Anagha Atul Post
Anagha Atul PostInstagram

अतुल घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणामुळे फक्त अनघा अतुलच नाही तर सर्वजण अस्वस्थ झाले आहेत. सगळीकडे सध्या याच प्रकरणाची चर्चा आहे. अशाप्रकारच्या सतत होणाऱ्या घटनांमुळे आता राज्यामध्ये सगळीकडे दहशतीचे वातावरण आहे. हे कुठे तरी थांबले पाहिजे असे मत आता नेटिझन्स व्यक्त करताना दिसत आहेत. या घटनेचा अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.

अभिषेक घोसाळकर यांची हत्या त्यांच्याच परिचित असलेल्या मॉरिस नोरन्हा उर्फ मॉरिस भाईने केली. कोरोना काळामध्ये मॉरिसने मोठ्या प्रमाणात समाजकार्य केले होते. त्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला होता. समाजसेवा करणाऱ्या मॉरिस आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यामध्ये असा काय वाद होता की ज्यामुळे हत्या आणि आत्महत्यासारखी घटना घडली असा प्रश्न स्थानिक रहिवाशांना पडला आहे. राजकीय वैमनस्यातूनच ही घटना घडल्याची देखील चर्चा सुरू आहे. याप्रकरणाचा तपास बोरिवली पोलिसांकडून सुरू आहे.

Anagha Atul On Abhishek Ghosalkar
Richa Chadha Pregnant: अभिनंदन! ऋचा चड्ढा- अली फजल होणार आई-बाबा, अनोख्या अंदाजमध्ये चाहत्यांना सांगितली गुड न्यूज

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com