बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) आणि चित्रपट निर्माता आदित्य धर (Aditya Dhar) यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. यामी आणि आदित्य आई-बाबा होणार असून त्यांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. आता यामीपाठोपाठ आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री आई होणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढा (Richa Chadha) आणि अली फजल (Ali Fazal) हे कपल देखील आई-बाबा होणार आहे. या कपलने सोशल मीडियावर अनोख्या अंदाजमध्ये पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत ही गुड न्यूज शेअर केली आहे. सध्या या कपलवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ऋचा चड्ढा आणि अली फजल यांनी कोरोना काळात म्हणजे 2020 मध्ये लॉकडाऊन दरम्यान लग्न केले. रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत लग्न केले होते. दोघेही त्यांच्या लव्हस्टोरी आणि अप्रतिम केमिस्ट्रीमुळे अनेकदा चर्चेत असतात. आता लग्नाच्या तीन वर्षानंतर ऋचा चड्ढा आणि अली फजल आई-बाबा होणार आहेत. रिचा चड्ढा आणि अली फजल यांनी ही आनंदाची बातमी खास पद्धतीने चाहत्यांसोबत शेअर केली आहे. आता रिचा आणि अली हे दोघांचे तीन होणार आहे. म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये नवा पाहुणा येणार आहे.
रिचा चड्ढा आणि अली फजल पहिल्यांदाच आई-बाबा होणार आहेत. लवकरच ते आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत. या कपलने सोशल मीडियावर एक जबरदस्त आणि आकर्षक पोस्ट शेअर करत या गुड न्यूजची घोषणा केली आहे. अलीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर '1 + 1 = 3' असे गणिताचे समिकरण लिहिल्याचा फोटो शेअर केला आहे. त्याचसोबत त्याने पत्नी रिचासोबतचा गोंडस फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोवर खालच्या बाजूला प्रग्नेंट महिलेचा इमोजी देखील टाकण्यात आला आहे.
अली फजलने इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'एका लहान हृदयाचा ठोका हा आमच्या जगातील सर्वात मोठा आवाज आहे.' त्याच्या या पोस्टला चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. ही आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांपर्यंत आणि मित्रांपर्यंत पोहोचताच सोशल मीडियावर रिचा आणि अलीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सर्वजण गुड्डू भैय्याचे अभिनंदन करत आहेत. तर अनेक जण रिचाला विशेष काळजी घेण्याचा सल्ला देत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.