Yogita- Saurabh Buy House: लग्नाच्या दोन महिन्यानंतर मराठमोळ्या कपलने घेतलं स्वतः चं घर; गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत दिली माहिती

Yogita Chavan And Saurabh Chaughule Buy House: मराठी अभिनेता सौरभ चौघुले आणि योगिता चव्हाणने मुंबईत स्वतः चे हक्काचे घर घेतले आहे. सौरभने सोशल मीडियावरुन ही माहिती शेअर केली आहे.
Yogita- Saurabh Buy House
Yogita- Saurabh Buy HouseSaam Tv

मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले. सौरभ आणि योगिताने कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेत एकत्र काम केले होते. या रिल लाइफ कपलने खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली आहे. लग्नाच्या दोन महिन्यानंतरच या दोघांनी नवीन घर घेतले आहे. या दोघांनी सोशल मीडियावर गृहप्रवेशाचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे.

अभिनेता सौरभ चौघुलेने फोटो पोस्ट करत स्वप्न पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. या फोटोंमध्ये सौरभ आणि योगित जोडीने स्वतःच्या नवीन गरात गृहप्रवेश करताना दिसत आहे. यावेळी सौरभ आणि योगिताने अगदी पारंपारिक लूक केलेला दिसत आहे. सौरभने सदरा आणि धोतर परिधान केले आहे तर योगिताने गुलाबी रंगाची काठपदर साडी नेसली आहे. तर दुसऱ्या फोटोत सौरभ आणि योगिताच्या नावाची नेमप्लेट पाहायला मिळत आहे. या दोघांनी नेमप्लेटवर स्वतः चे नाव लिहले आहे.

सौरभ आणि योगिताने गृहप्रवेशाचे फोटो पोस्ट करत त्यावर खास कॅप्शन दिले आहे. 'एक स्वप्न आपलं, एकत्र पूर्ण करूया. नवीन शहरात, नवीन संसार थाटूया',असं कॅप्शन दिले आहे. त्यांनी पवईत घर घेतल्याची असल्याची माहिती समोर येत आहे. सौरभ योगिताने ३ मार्च २०२४ रोजी लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर त्यांनी स्वतः चे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. या दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांनी योगिता आणि सौरभला शुभेच्छा दिल्या आहेत.

Yogita- Saurabh Buy House
HBD Mika Singh: कॉन्ट्रोवर्सी किंग ते महागड्या कारची आवड; गायक मिका सिंगची संपत्ती माहितीये का?

योगिता आणि सौरभच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, या दोघांनीही जीव माझा गुंतला या मालिकेत एकत्र काम केले होते. सौरभ यानंतर सन मराठीवरील सुदरी या मालिकेत दिसला होता.

Yogita- Saurabh Buy House
Celebrities in PM Oath Ceremony: नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड तारकांची मंदियाळी; शाहरुख खानसह 'या' कलाकारांनी लावली हजेरी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com