HBD Mika Singh
HBD Mika SinghSaam Tv

HBD Mika Singh: कॉन्ट्रोवर्सी किंग ते महागड्या कारची आवड; गायक मिका सिंगची संपत्ती माहितीये का?

Singer Mika Singh Birthday: प्रसिद्ध गायक मिका सिंग आज आपला ४७ वा वाढदिवस साजरा करत आहे. मिका सिंगचा जन्म १० जून १९७७रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला. मिका सिंग आज कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे.
Published on

बॉलिवूड गायक मिका सिंग हा नेहमीच आपल्या गाण्याने प्रेक्षकांची मने जिंकत असतो. मिका सिंगच्या गाण्याने चाहत्यांना वेड लावले आहे. मिका सिंगच्या आवाजात वेगळीच जादू असे, असे चाहते म्हणतात. मिका सिंग आज आपला ४७ वा वाढदिवस साजरा करत आहे. मिका सिंगचा जन्म १० जून १९७७ मध्ये पश्चिम बंगालमधील दुर्गापूर जिल्ह्यात झाला.

मिका सिंग हा अनेकदा वादांमुळे चर्चेत आला आहे. मिका सिंग आणि राखी सावंत यांच्यातील वाद हा सर्वांनाच माहिती आहे. मिका सिंगने राखी सावंतला किस केले होते. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्यानंतर मीत ब्रोस यांनी 'ए भाई तुने पप्पी क्यो ली' असे गाणेदेखील रिलीज केले होते. त्यामुळे मिका सिंक चर्चेत होता. मिका सिंगला लक्झरी लाइफस्टाइल आणि महागड्या गाड्यांचा शौक आहे. मिका सिंगची संपत्ती कोट्यवधी रुपयांची आहे. जाणून घेऊया मिका सिंगच्या संपत्तीबद्दल.

मीडिया रिपोर्टनुसार मिका सिंगची एकूण संपत्ती जवळपास ९५.९८ कोटी रुपयांची आहे. मिका सिंग जगभरात गाण्यांचे शो करतो. त्याच माध्यमातून तो सर्वाधिक कमाई करतो, असे सांगण्यात आले आहे. मिका सिंगने अनेक टीव्ही शो आणि गाण्यांच्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. याच माध्यमातून मिका सिंग कमाई करतो.

मीडिया रिपोर्टनुसार मिका सिंगला महागड्या गाड्या घेण्याचा शौक आहे. त्याच्याकडे अनेक कार आहेत. मिका सिंगकडे पोर्श पैनमेरा कार आहे. या कारची किंमत १.४६ कोटी रुपये आहे. याचसोबत Hummer H3 आहे. या कारची किंमत ८० लाख रुपये आहे. मिका सिंगकडे लम्बोर्गिनी कार आहे. या कारची किंमत ३ कोटी रुपये आहे.

HBD Mika Singh
Celebrities in PM Oath Ceremony: नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड तारकांची मंदियाळी; शाहरुख खानसह 'या' कलाकारांनी लावली हजेरी

त्याचसोबत ७६ लाखांची फोर्ड मस्टँग कार आहे. मिका सिंगकडे मर्सिडिज जीएलएस कार आहे. या कारची किंमत १.०७ कोटी रुपये आहे. त्याचसोबत डॉज चॅलेंजर एसआरटी हेलकॅट ही नवीन कार आहे. या कारची किंमत ५२ लाख रुपये आहे.

मिंका सिंग याच्याकडे त्याचे स्वतः चे प्रायव्हेट जेट आहे. मिकाकडे लेटेस्ट सीरीजच्या अनेक कार आहे. मिका सिंग म्युझिक अल्बममधूनदेखील कोट्यवधी रुपये कमावतो.

HBD Mika Singh
Siddharth Jadhav: सिद्धार्थ जाधवची आणखी एका पुरस्काराला गवसणी; बालभारती चित्रपटासाठी मिळाला बेस्ट अ‍ॅक्टर अवॉर्ड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com