ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येक व्यक्तीला आपले वाहन अत्यंत प्रिय असते ,त्यामुळे त्या वाहनाची जास्त काळजी घेतली जाते.
मात्र तुम्हाला माहिती आहे का? घरी कार धुताना कोणती काळजी घ्यावी.
कार धुताना कधीही कपड्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या वॉशिंग पावडरचा वापर करु नये.
बाजारात खास कार धुण्यासाठी कार वॉशिंग शॅम्पू मिळतात,त्यानेच कार धुवावी.
अनेकदा कार धुण्यासाठी विविध केमिकल्सचा वापर करण्यात येतो, त्यामुळेही चूक करु नका.
जर तुमच्या कारवर मोठ्या प्रमाणात धुळ बसलेली असले, तर चुकूनही कोरड्या कापडाचा वापर करु नका. याने कारवर क्रॅश पडण्याची शक्यता असते.
कार धुतल्यानंतर ती तशीच उन्हात ठेवू नका,याने कारवर पाण्याचे डाग बसतात.
कार पुसण्यासाठी कायम मऊ कापडाचा वापर करावा.