Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

Siddharth Jadhav Fake Death News : प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या निधनाची अफवा पसरवली जात आहे, यासंबंधित स्वतः अभिनेत्याने व्हिडीओ शेअर करून संताप व्यक्त केला आहे.
Siddharth Jadhav Fake Death News
Marathi ActorSAAM TV
Published On
Summary

मराठी अभिनेत्याच्या निधनाची अफवा

स्वतः अभिनेत्याने व्हिडीओ शेअर करून संताप व्यक्त केला

अभिनेता स्वतःच्या मृत्यूच्या खोट्या बातमीवर चांगलाच भडकला

मनोरंजन विश्वातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याच्या मृत्यूची अफवा पसरवली जाते आहे, यामुळे स्वतः अभिनेताच चांगला संतापला आहे. आपल्या कॉमेडी शैलीने प्रेक्षकांच्या मनात घर करणारा मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या (Siddharth Jadhav) मृत्यूची खोटी बातमी सोशल मीडियावर पसरवली जात आहे. स्वतःच्या मृत्यूची बातमी पाहताच सिद्धार्थ जाधव भडकला. थेट व्हिडीओ शेअर करून त्याने कानउघाडणी केली आहे.

सिद्धार्थ जाधवने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तो आपल्या मोबाईलमध्ये आलेली स्वतःच्या मुत्यूची खोटी बातमी दाखवत आहे. युट्यूबवर एका चॅनेलवर दिसत आहे की, "अभिनेते सिद्धार्थ जाधव यांची मृत्यूशी झुंज, गंभीर आजार" अशी बातमी चालवली जात आहे. हे पाहून सिद्धार्थ जाधवला हसू अनावर झाले असून त्याने स्पष्ट शब्दात याचा निषेध केला आहे. अभिनेत्याने तो ठणठणीत बरा असून आपल्या कामात व्यस्त असल्याचे सांगितले आहे.

सिद्धार्थ जाधवची पोस्ट

"नमस्कार

मी ठणठणीत बरा आहे. व्यवस्थित ॲनिमलचे प्रयोग, धिंगाणाचं shoot suru aahe...

ज्या ज्या लोकांनी काळजीने msg /call केलेत, त्यांना मनापासून धन्यवाद!

बातमीदार जरा मला तरी विचारा...एवढी कसली घाई आहे तुम्हाला???

ज्याने Headline /coverage बनवलाय, त्याला तर Nobel द्याच...

Man is a more dangerous Animal than an 'ANIMAL'

(त्यांच जाऊ दे, निदान माझ्या नाटकाचं तरी promotion करतो. News वाले या माझ्या नाटकाला 26 ऑगस्ट 8 वा. छत्रपती शिवाजीमंदिर दादर ला.)

Siddharth Jadhav Fake Death News
Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

सिद्धार्थ जाधवने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकरी भरभरून कमेंट्स करत आहेत. तसेच सिद्धार्थ जाधवचे चाहते चांगलेच भडकले आहेत. सिद्धार्थ जाधवने मराठीसोबत बॉलिवूडही गाजवले आहे. सध्या तो आपल्या 'ॲनिमल' नाटकामुळे चांगलाच चर्चेत आहे. तसेच तो लवकरच 'आता होऊ दे धिंगाणा ५'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो 29 ऑगस्टपासून शनिवार-रविवार रात्री 9:00 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com