Sankarshan Karhade: कवी मनाचा संकर्षण कऱ्हाडे नव्या भूमिकेत, पण जरा हटके...;

परभणी महानगरपालिकेच्या वतीने मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडेची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.
Sankarshan Karhade
Sankarshan KarhadeSaam Tv

Sankarshan Karhade: महानगरपालिकेकडून शहर स्वच्छ राहावे, नागरिकांना स्वच्छतेची सवय व्हावी, घनकचरा व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने व्हावे, शौचालयांची स्वच्छता असे अनेक उपक्रम सध्या केंद्र सरकारकडून ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत राबवण्यात येत आहेत. परभणी महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये सहभाग घेतला आहे. यासाठी महानगरपालिकेच्या वतीने मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडेची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.

Sankarshan Karhade
Nawazuddin Siddiqui: '२५ कोटी दिले तरी 'ती' गोष्ट करणार नाही!; ज्यामुळं करिअर घडलं त्यावरच नवाजुद्दीन थेट बोलला...

यामध्ये सर्वोत्तम स्थान मिळविण्यासाठी परभणी महापालिका प्रशासक तथा आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबवले जात आहेत. नागरिकांमध्‍ये स्‍वच्‍छतेबाबत जनजागृती करण्‍यासाठी महापालिकेच्‍या वतीने विविध उपक्रम राबवत आहेत.

Sankarshan Karhade
Pathaan Release Date: 'पठान' चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर, केआरकेचा दावा खरा ठरणार का?

प्रेक्षकांना जर त्‍यांच्‍या आवडत्‍या कलाकाराने एखादी गोष्‍ट करायला सांगितली तर ती गोष्ट करण्यासाठी पटकन तयार होतात. यामुळे असा कलाकार जो प्रत्‍येकाचा आवडता असेल व त्‍याच्‍या सहभागामुळे स्वच्छतेची जनजागृती करणे, नागरिकांचा सहभाग वाढवणे सहज शक्‍य होईल.

Sankarshan Karhade
Urfi Javed : 'मी भाजपमध्ये आले की...'; संजय आठवतो का म्हणत उर्फीचं चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर

महापालिकेच्‍या वतीने नुकतेच महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध कलाकार, लेखक, कवी परभणीचा भूमिपुत्र संकर्षण कऱ्हाडेची स्वच्छता अभियानासाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली होती. महापालिकेने स्‍वच्‍छ सर्वेक्षण २०२३ या मोहिमेच्या जनजागृतीसाठी त्याची नियुक्ती झाली आहे, अशी माहिती महापालिका प्रशासक तथा आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com