Maharashtra Epstein Files: अशोक खरातची भूमिका साकारणार 'हा' प्रसिद्ध अभिनेता! 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स'मधील गूढ उकललं

Maharashtra Epstein Files: महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स सिनेमात अभिनेता मनोज जोशी अशोक खरातची भूमिका साकारणार आहेत. दीपाली सय्यद आणि सुबोध भावेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून सिनेमा २० नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
Maharashtra Epstein Files
Maharashtra Epstein FilesSaam Tv
Published On: 

Maharashtra Epstein Files: महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडवणाऱ्या अशोक खरात प्रकरणावर आधारित 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' (Maharashtra Epstein Files) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. विशेष म्हणजे, या सिनेमात कोणते कलाकार कोणत्या राजकीय व्यक्तींच्या भूमिका साकारणार, याबाबतही अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर सिनेमातील महत्त्वाच्या भूमिकांवरील पडदा आता हटवण्यात आला आहे. सर्वाधिक चर्चेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातच्या भूमिकेत दिग्गज अभिनेते मनोज जोशी झळकणार असल्याचं निर्मात्यांनी जाहीर केलं आहे.

मनोज जोशी साकारणार अशोक खरातची भूमिका

'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' या सिनेमात अशोक खरातची भूमिका कोण साकारणार, हा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना पडला होता. आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं असून अभिनेता मनोज जोशी या भूमिकेत दिसणार आहेत. मनोज जोशी यांनी हिंदी, मराठी, गुजराती, पंजाबी आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विनोदी भूमिकांपासून ते गंभीर व्यक्तिरेखांपर्यंत त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. सिनेमाचा ट्रेलर समोर आल्यानंतर मनोज जोशी यांची देहबोली आणि लूक सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यांचा लूक अशोक खरातच्या व्यक्तिरेखेशी मिळताजुळता असल्याचं अनेक नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

Maharashtra Epstein Files
'नाचते हुए मरी तो मिसाल बन जाऊंगी'; लावणीसम्राज्ञी विठाबाईंची कहाणी मोठ्या पडद्यावर; 'ईठा'चा शानदार ट्रेलर प्रदर्शित

दीपाली सय्यद आणि सुबोध भावेही महत्त्वाच्या भूमिकेत

या सिनेमात अभिनेत्री आणि नृत्यांगना दीपाली सय्यद यांचीही महत्त्वाची भूमिका असणार आहे. त्या रुपाली चाकणकरांशी संबंधित भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. मात्र, त्यांच्या भूमिकेबाबत सविस्तर माहिती समोर येणे बाकी आहे. तसेच अभिनेता सुबोध भावेही या सिनेमात झळकणार असून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका साकारणार असल्याचं बोललं जात आहे.

Maharashtra Epstein Files
Model Extortion Case: मुंबईत प्रसिद्ध मॉडेलविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल; व्यावसायिकाकडे १.३९ कोटींची मागणी केल्याचा आरोप

काय आहे अशोक खरात प्रकरण?

नाशिकमधील अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करून महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप त्याच्यावर करण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचा दावा करण्यात आला. तसेच काही राजकीय व्यक्तींशी संबंधित फोटो समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातही आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर आधारित 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' हा सिनेमा २० नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.