Manjar Marathi Movie: घरभर पसारा अन् 3 मित्रांची धमाल; 'मांजर' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Manjar Marathi Movie: ‘मांजर’ या आगामी मराठी चित्रपटाच्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. तीन मित्र, घरभर पसारा आणि भन्नाट गोंधळाची झलक पाहायला मिळते. चित्रपट १८ सप्टेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.
Manjar Marathi Movie
Manjar Marathi MovieSaam Tv
Published On

Manjar Marathi Movie: तीन मित्र… घरभर पसरलेला पसारा… आणि सगळा गोंधळ ! याच भन्नाट कुतूहलाची झलक दाखवत ‘मांजर’ या आगामी मराठी चित्रपटाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे दृश्य पाहिल्यावर प्रश्न पडतोच, ‘मांजर’ आणि या सगळ्याचा काय संबंध आहे.

घरातला पसारा, बिनधास्त मित्रांची गँग आणि त्यांचं बेफिकीर जगणं … या चित्रातून ‘मांजर’ ही केवळ तीन मित्रांची गोष्ट नसून हसवणाऱ्या आणि गोंधळात टाकणाऱ्या घटनांची धमाल कॉमेडी असल्याची झलक मिळते. पोस्टरमध्ये दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी भन्नाट किस्सा दडलेला आहे की काय, अशी उत्सुकता निर्माण झाली आहे. एचथ्रीओ मोशन पिक्चर्स आणि जस्ट राईट फिल्म्स निर्मित ‘मांजर’चं दिग्दर्शन सुशील महादेव यांनी केलं आहे. चित्रपटात सिद्धार्थ मेनन, ओंकार भोजने, तेजस राऊत आणि भाग्यश्री लिमये यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पोस्टरमध्ये या चौघांची धमाल केमिस्ट्री पाहायला मिळते.

Manjar Marathi Movie
Kangana Ranaut: नसीरुद्दीन शाहांच्या वक्तव्यावर कंगना रणौतचा पलटवार; म्हणाली, बॉलिवूड पाकिस्तानची प्रेमकहाणी कधी संपणार?

पोस्टरमध्ये घरातील अस्ताव्यस्त पसारा लक्ष वेधून घेतो. कपडे, मोबाईल, लॅपटॉप, इअरफोन्स, बॅग्ज आणि रोजच्या वापराच्या वस्तूंमध्ये तीन मित्र अक्षरशः बिनधास्त लोळताना दिसतात. या सगळ्या गोंधळामध्ये ‘मांजर’ या नावाभोवती नेमकं काय घडलंय आणि त्यातून या मित्रांच्या निवांत विश्वात कोणता गोंधळ निर्माण झाला आहे, याचं उत्तर पोस्टर देत नाही, तर उलट उत्सुकता आणखी वाढवतं.

दिग्दर्शक सुशील महादेव म्हणतात, “‘मांजर’मध्ये तीन मित्रांचं मोकळंढाकळं विश्व आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भन्नाट परिस्थिती पाहायला मिळणार आहेत. मांजर हा त्यांच्या जगाचा आधीपासूनच एक भाग आहे; मात्र त्याच्याभोवती घडणाऱ्या घटनांमुळे त्यांच्या आयुष्यात मजेशीर परिस्थिती निर्माण होते. पात्रांची केमिस्ट्री, कॉमेडी आणि या सगळ्या गोंधळामागचं कारण प्रेक्षकांना नक्कीच एंटरटेन करेल. मांजराचं या संपूर्ण कथेत नेमकं काय स्थान आहे, हे आम्ही सध्या गुलदस्त्यातच ठेवलं आहे.”

Manjar Marathi Movie
Mulshi Pattern 2: प्रविण तरडेंच्या 'मुळशी पॅटर्न 2'ला मुळशीकरांचा विरोध; तालुक्याची बदनामी होत असल्याचा आरोप

हर्ष, अविनाश शर्मा, हरि राजपूत, बंटी नागी आणि जसबीर नागी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सयाजी शिंदे, अंशुमन विचारे, वैष्णवी अंधाडे आणि अश्विनी काळसेकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या वितरणाची धुरा एए फिल्म्सने सांभाळली आहे. येत्या १८ सप्टेंबर २०२६ रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com