Mallika Sherawat : मल्लिका शेरावत 'बिग बॉस 19'मध्ये सहभागी होणार का? स्वतःच केला खुलासा

Mallika Sherawat-Bigg Boss 19: बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतने तिच्या 'बिग बॉस 19'मधील एन्ट्रीबद्दल अखेर मौन सोडले आहे. ती नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात.
Mallika Sherawat-Bigg Boss 19:
Mallika SherawatSAAM TV
Published On
Summary

सलमान खानचा 'बिग बॉस 19' शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'बिग बॉस 19'मध्ये मल्लिका शेरावत झळकणार अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.

मल्लिका शेरावतने आता आपल्या 'बिग बॉस 19'मधील एन्ट्रीवर मौन सोडले आहे.

सध्या सोशल मीडियावर सलमान खानच्या (Salman Khan) 'बिग बॉस 19' (Bigg Boss 19)ची चर्चा पाहायला मिळत आहे. चाहते बिग बॉसच्या नवीन पर्वासाठी खूप उत्सुक आहेत. कारण या पर्वात अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत. यंदाच्या पर्वात कोणते कलाकार झळकणार याविषयी सोशल मीडियावर कायम चर्चा रंगलेली पाहायला मिळते. ज्यातून अनेक नावे समोर येतात. त्यातील एक नाव म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) होय.

अनेक दिवसांपासून मल्लिका शेरावतचे (Mallika Sherawat) नाव 'बिग बॉस 19' साठी घेतले जात आहे. ती यंदाच्या पर्वाचा भाग असणार असल्याचे बोले गेले. मात्र आता याबाबत स्वतः मल्लिका शेरावतने मोठा खुलासा केला आहे. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून 'बिग बॉस 19'मधील तिच्या एन्ट्रीबद्दल मोठी अपडेट दिली आहे. मल्लिकाने पोस्टमधून चाहत्यांना माहिती दिली की, ती 'बिग बॉस 19'चा भाग नाही आहे. मल्लिका नेमकं काय म्हणाली जाणून घेऊयात.

मल्लिका शेरावत पोस्ट

"सर्व अफवांना पूर्णविराम... मी 'बिग बॉस' करत नाही आहे आणि भविष्यात करणारही नाही. धन्यवाद!"

Mallika Sherawat
Mallika Sherawatinstagram

मल्लिकाची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहते मल्लिका शेरावतला 'बिग बॉस 19'मध्ये पाहण्यासाठी उत्सुक होते. 'बिग बॉस 19'मध्ये नेमकं कोणते कलाकार दिसणार याचा अद्याप कोणताही अधिकृत खुलासा झाला नाही आहे.

मल्लिका शेरावत वर्कफ्रंट

मल्लिका शेरावत अलिकेडच 2024 ला 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' या चित्रपटात दिसली. मल्लिकाचा सोशल मीडियावर मोठी चाहता वर्ग आहे. कायम आपल्या लूकचे आणि फिटनेसचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या आगामी प्रोजेक्टची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Mallika Sherawat-Bigg Boss 19:
Ankita Walawalkar : कचऱ्याचा ढीग पाहून अंकिता वालावलकर संतापली; म्हणाली- "गेटवर नाव महाराजांचं,पण..."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com