Minu Muneer: लोकप्रिय अभिनेत्यांकडून शारीरिक शोषण; थेट नाव घेत मल्याळम अभिनेत्रीने सांगितली 'बॅड टच'ची आपबीती

Minu Muneer Physical Abuse: अभिनेत्री मीनू मुनीरने लोकप्रिय अभिनेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. शूटिंगदरम्यान तिचे शारीरिक शोषण झाले, असा तिचा दावा आहे.
Minu Muneer: लोकप्रिय अभिनेत्यांकडून शारीरिक शोषण;  थेट नाव घेत मल्याळम अभिनेत्रीने सांगितली 'बॅड टच'ची आपबीती
matrubhumi
Published On

मल्याळम चित्रपट अभिनेत्री मीनू मुनीरने ज्येष्ठ कलाकारांबद्दल धक्कादायक खुलासा केला. मुकेश एम आणि जयसूर्या यांच्यावर शारीरिक शोषणाचे आरोप केले आहेत. अभिनेत्रीने फेसबुकवर पोस्ट वर हे आरोप केलेत. मुकेश, मणियानपिल्ला राजू, इदवेला बाबू आणि जयसूर्या यांनी शारीरिक आणि शाब्दिक अत्याचार केल्याचा आरोप या अभिनेत्रीने केलाय.

अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्येल लिहिले की,- 'माझ्यावर शारीरिक आणि शाब्दिक शोषण झाले. २०१३ मध्ये एका प्रोजेक्टवर काम करत असताना माझ्यावर शारीरिक आणि शाब्दिक अत्याचार झालेत. सहकार्य करून काम करण्याचा प्रयत्न केला, पण नंतर शिवीगाळ असह्य झाली. 'मला मल्याळम इंडस्ट्री सोडून चेन्नईला जाण्यास भाग पाडल्या गेलं. मी लेखातून या शोषणाविरुद्ध आवाज उठवला होता. माझ्यावर झालेल्या सर्व शोषणाविरुद्ध आणि न्यायासाठी याचना करतेय. त्यांच्या घृणास्पद कृत्याविरुद्ध मी मदतीची याचना करतेय.

एनडीटीव्हीशी बोलताना अभिनेत्रीने तिच्यावर बेतलेली आपबीती सांगितली. 'चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मला खूप वाईट अनुभव आला. मी टॉयलेटला गेले होते आणि जेव्हा मी परत आले तेव्हा जयसूर्याने मला मागून पकडलं आणि माझ्या संमतीशिवाय माझे चुंबन घेतलं. मला धक्काच बसला आणि पळत सुटले. अभिनेत्याने एक ऑफर दिली होती. जर ती त्याच्यासोबत राहिली तर तो तिला काम देणार असा आरोप अभिनेत्रीने केलाय.

'मल्याळम इंडस्ट्रीमध्ये खूप शोषण होतं. मी साक्षीदारही आहे आणि पीडितही आहे. जेव्हा मी चेन्नईला गेले तेव्हा मला कोणीही विचारले नाही की काय झाले? अभिनेत्री रेवती संपतनेही अभिनेता सिद्दीकीवर गंभीर आरोप केले आहेत. रेवतीने सिद्दीकी यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केलाय.

Minu Muneer: लोकप्रिय अभिनेत्यांकडून शारीरिक शोषण;  थेट नाव घेत मल्याळम अभिनेत्रीने सांगितली 'बॅड टच'ची आपबीती
Suhasini Deshpande : ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं निधन; मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com