Maharashtrachi Hasyajatra: हास्यजत्रेच्या टीमचा परदेश दौरा; थेट पॅरिसच्या एअरपोर्टवरच सुरू केली Rehearsal, व्हिडीओ पाहा

Maharashtachi Hasya Jatra Team Video: महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो अमेरिकेत होणार आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्राची संपूर्ण टीम अमेरिकेला रवाना झाली आहे.
Entertainment News
Maharashtrachi HasyajatraSaam Tv
Published On

छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा लोकप्रिय शो आहे. गेली अनेकवर्ष हा शो प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहे. या शोचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशात देखील महाराष्ट्राची हास्यजत्राची क्रेझ आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा हा लोकप्रिय कार्यक्रमाचे जगभरात प्रेक्षक आहेत. परदेशात या कार्यक्रमाचे शो सुरू असतात. आता अमेरिकेत या कार्यक्रमाचे शो सुरू होणार आहेत.आता महाराष्ट्राची हास्यजत्राची संपूर्ण टीम अमेरिकेला रवाना झाली आहे.

Entertainment News
Sachin-Supriya Dance : "जहां मैं जाती हूँ.." सचिन - सुप्रियाचा रोमॅटिंक अंदाज, व्हिडीओ पाहिलात का?

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने संपूर्ण जगभरातील प्रेक्षकांच्या मनात अनोखं स्थान केलं आहे. आता लवकरच अमेरिकेत या कार्यक्रमाचे लाइव्ह शो सुरू होणार आहेत. मंगळवारी महाराष्ट्राची हास्यजत्राची संपूर्ण टीम भारतातून अमेरिकेच्या दिशेने निघाली आहे. सोशल मीडियावर अभिनेता प्रसाद खांडेकरने टीमची व्हिडीओ पोस्ट करत माहिती दिली होती.

Maharashtrachi Hasya Jatra Team
Maharashtrachi Hasya Jatra TeamChetana Bhat Instagram

अमेरिकेत पोहोचल्यानंतर लगेचच या शोची सुरूवात होणार आहे. दरम्यान कलाकार मंडळीनी प्रवासादरम्यान त्यांची रिहर्सल सुरू केली आहे. पॅरिस विमानतळावर बसून स्किटचा सराव करतानाचे फोटो शेअर अभिनेत्री चेतना भटने शेअर केले आहेत. फोटोंना चेतनाने, "पॅरिस विमानतळावर आमची रिहर्सल" असं कॅप्शन दिलं आहे. फोटोमध्ये कलाकार स्किट वाचताना दिसत आहेत. सोशल मीडियावर महाराष्ट्रातील हास्यजत्रा या टीमचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे.

Entertainment News
Ek Daav Bhutach Song Out : सिद्धार्थ जाधव म्हणतोय 'देखणं पाखरु लाजलं'...सोनू निगमच्या सुरांची मिळाली साथ

अमेरिकेत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा शो MHJ Live आहे. १९ सप्टेंबर २०२४ ते ६ ऑक्टोबर २०२४ या दरम्यान हा शो होईल. अमेरिकेतील शार्लोट, वॉशिंग्टन डीसी, बोस्टन, न्यू जर्सी, शिकागो, डॅलस, ऑस्टिन, ह्युस्टन, सिएटल, सॅन जोस, लॉस एंजेलिस या मोठ्या ११ शहरांमध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचे लाइव्ह शो होणार आहेत. चेतना भट,प्रभाकर मोरे, समीर चौघुले, इशा डे, दत्तू मोरे, नम्रता संभेराव, रसिका वेंगुर्लेकर ही कलाकार मंडळी अमेरिकेत महाराष्ट्राची हास्यजत्रा शोची धमाल, मस्ती याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com