Prabhakar More In NCP
Prabhakar More In NCPSaam Tv

Prabhakar More: हास्यजत्रेतला 'कोकणचा पारसमणी' प्रभाकर मोरेची राजकारणात एन्ट्री, 'या' पक्षात केला प्रवेश

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेते प्रभाकर मोरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये केला आहे.
Published on

निवृत्ती बाबर

Prabhakar More: अनेक कलाकार सध्या राजकारणात सक्रीय आहेत. आपल्या अभिनयासोबतच त्यांची राजकारणातील चर्चाही अनेकदा होते. त्यातच आता महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेते प्रभाकर मोरे यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये केला आहे.

Prabhakar More In NCP
Ileana D'Cruz Admitted: अभिनेत्री इलियाना डिक्रूज रुग्णालयात, अचानक असे काय घडले?

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईतील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात हा पक्ष प्रवेश पार पडला. प्रभाकर मोरे यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रा, कॉमेडीची बुलेट ट्रेन, शेजारी शेजारी यासारख्या मालिकेत मोरे यांनी प्रमुख भुमिका साकरल्या होत्या.

Prabhakar More In NCP
Sayali Sanjeev: ऋतुराजच्या वाढदिवशी सायली संजीवने कापला केक, सोशल मीडियावर पुन्हा चर्चांना उधाण

आता पर्यंत अनेक मराठी सेलिब्रिटींनी राजकारणात सक्रिय प्रवेश केला आहे. अमोल कोल्हे, दीपाली सय्यद, उर्मिला मातोंडकर, आदेश बांदोडकर असे काही कलाकार राजकारणात सक्रिय आहेत. यांच्या नंतर आता महाराष्ट्राचा कॉमेडीवीर प्रभाकर मोरे यांनीही राजकारणात एन्ट्री केली आहे.

Prabhakar More In NCP
Preity Zinta Birthday: प्रीतीच्या अंडरवर्ल्ड कनेक्शने बॉलिवूडला बसला होता धक्का, तिच्या एका निर्णयाचं आजही होतंय कौतुक...

प्रभाकर मोरे मुळचे कोकणस्थ. प्रभाकर मोरे सर्वाधिक चर्चेत आले महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून. सोबतच प्रभाकर मोरे यांनी आपल्या कॉमेडीचा डंका महाराष्ट्राची हास्यजत्रेसोबत कॉमेडीची बुलेट ट्रेन, शेजारी शेजारी यासारख्या मालिकेत प्रमुख भुमिका साकरली होती. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात प्रभाकर मोरेंची ओळख 'कोकणचा पारसमणी' म्हणून सर्वाधिक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com