KBC मध्ये राज्याच्या न्यायव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह! अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीला थेट नोटीस, नेमकं प्रकरण काय?

Kaun Banega Crorepati 18: कौन बनेगा करोडपती 18 मधील पंजाबच्या कायदा सुव्यवस्थेबाबतच्या प्रश्नावरून वाद निर्माण झाला आहे. वकील इंद्रजीत अरोरा यांनी अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
Kaun Banega Crorepati 18
Kaun Banega Crorepati 18Saam Tv
Published On: 

Kaun Banega Crorepati 18: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय क्विझ शो 'कौन बनेगा करोडपती 18' (KBC 18) सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. या शोमध्ये पंजाब राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावरून वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी पंजाबमधील संगरूर येथील वकील इंद्रजीत अरोरा यांनी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या प्रश्नामुळे पंजाब राज्याची प्रतिमा मलीन होत असून राज्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

नेमका कोणत्या प्रश्नावरून निर्माण झाला वाद?

'द स्टेट्समन'च्या वृत्तानुसार, वकील इंद्रजीत अरोरा यांनी एका व्हिडिओ क्लिपच्या आधारे या प्रश्नावर आक्षेप घेतला आहे. या क्लिपमध्ये 'कौन बनेगा करोडपती'च्या एका भागात स्पर्धकाला १२ लाख ५० हजार रुपयांसाठी प्रश्न विचारण्यात आल्याचे दिसत आहे. 'अलीकडे कोणत्या राज्यातील पोलीस ठाण्यांवर बॉम्बहल्ले करण्यात गुन्हेगार घाबरत नाहीत?' असा हा प्रश्न होता. या प्रश्नाचे स्पष्टीकरण देताना अमिताभ बच्चन यांनी पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा संदर्भ देताना म्हणाले, 'पंजाबमध्ये कायदेव्यवस्था इतकी खराब झाली आहे की, आजच्या काळात पोलीस ठाण्यातच बॉम्बहल्ले होत आहेत. पंजाबच्या न्यायव्यवस्थेवर सतत प्रश्न विचारले जात आहेत आणि आम आदमी पार्टी हे प्रश्न सोडवण्यात असफल होत आहे.' अमिताभ बच्चन यांच्या या वक्तव्यामुळे पंजाब राज्यातील परिस्थितीचे नकारात्मक चित्र उभे राहत असल्याचा आक्षेप वकिलांनी घेतला आहे.

Kaun Banega Crorepati 18
Actor Death: मनोरंजनसृष्टीतील आणखी एक तारा हरपला! प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; परदेशात अखेरचा श्वास, सिनेविश्वात हळहळ

पंजाबची प्रतिमा खराब केल्याचा आरोप

वकील इंद्रजीत अरोरा यांच्या मते, 'कौन बनेगा करोडपती'सारख्या लोकप्रिय कार्यक्रमातून सामान्य ज्ञानाच्या नावाखाली एखाद्या राज्याची बदनामी होणे योग्य नाही. या प्रश्नाचा उद्देश केवळ स्पर्धकाच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे नसून पंजाबची प्रतिमा खराब करण्याचा होता असे त्यांनी म्हटले.

Kaun Banega Crorepati 18
Kaaliya Movie: कार्तिक आर्यनचा वाढदिवशी चाहत्यांना मोठ सरप्राईज! 'कालिया'चा थरारक टीझर रिलीज, श्रीकृष्ण कथेतून उलगडणार रहस्य

अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीकडे बिनशर्त माफीची मागणी

या नोटीसमध्ये दाखवण्यात आलेल्या भागातील वादग्रस्त प्रश्न आणि व्हिडिओ हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, हा व्हिडिओ खरोखरच 'कौन बनेगा करोडपती 18' या कार्यक्रमाचा भाग असल्याचे सिद्ध झाल्यास अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीने पंजाबच्या जनतेची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.