Vivek Sangls's New Home : 'लग्नानंतर होईलच प्रेम' मधील जिवाने घेतले स्वप्नातले घर, चाहत्यांनी दिल्या भरभरून शुभेच्छा

Marathi Actor Buys House : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मधील जिवाने घेतलं नवीन घर. चाहत्यांनी सोशल मीडियावर दिल्या शुभेच्छा. जिवाच्या आयुष्यातील खास क्षण, साजरा झाला भरभरून प्रेमासह.
TV Star vivek sangle Enters New Home – Warm Wishes Pour In from Fans
TV Star vivek sangle Enters New Home – Warm Wishes Pour In from FansTring/ Lokmat.com
Published On

मराठी मनोरंजनक्षेत्रातील अभिनेता विवेक सांगळे सध्या त्याच्या 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेतून प्रेक्षकांचे प्रेम मिळवत आहे. अशात तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. विवेकने नुकतेच मुंबईत त्याच्या स्वप्नातले घर घेतले आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवीन घराच्या वास्तूशांतीचे काही व्हिडिओज पोस्ट केले आहेत. या व्हिडिओजच्या माध्यमातून विवेकने हा आनंदाचा क्षण चाहत्यांसह शेअर केला आहे.

TV Star vivek sangle Enters New Home – Warm Wishes Pour In from Fans
Lagnanantar Hoilach Prem: घटस्फोटाचा गैरसमज होणार दूर! लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत येणार रोमँटिक ट्विस्ट

विवेकचे हे नवीन आलिशान घर लालबाग परिसरात आहे. त्याने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये त्याच्या घराची एक झलक पहायला मिळते . ज्यामध्ये हॉलमधील बाल्कनीतून मुंबई नगरीचा सुंदर नजारा दिसत आहे. शिवाय व्हिडिओमध्ये घराच्या कमाल इंटिरीअरचीही झलक दिसत आहे. विवेकने हे व्हिडिओ पोस्ट करताच चाहत्यांनी कमेंट्समध्ये शुभेच्छांचा वर्षाव केला. काहींनी विवेकला तो सध्या काम करत असलेल्या मालिकेतील नावानेच "अभिनंदन जिवा देशमुख" असे लिहून शुभेच्छा दिल्या आहेत तर, काहींनी गृहप्रवेशाच्या पूजेतील भजनाचे कौतुक केले आहे.

एका पोस्टमध्ये नवीन घराच्या शुभेच्छा द्यायला 'भाग्य दिले तु मला' च्या टिमने त्याच्या नव्या घरी हजेरी लावलेली. यावेळी अभिनेत्री तन्वी मुंडले, जान्हवी किल्लेकर, अभिनेता अमित रेखी, अतुल महाजन आणि निलेश रानडे उपस्थित होते. विवेकच्या नवीन घरी त्याच्या 'भाग्य दिले तु मला' मालिकेची रियुनियन झाली असे म्हणायला हरकत नाही. याशिवाय इंडस्ट्रीतील इतर मित्रमंडळही हजर होते. आलेल्या सर्वांनीच विवेकला भरभरून शुभेच्छा दिल्या.

TV Star vivek sangle Enters New Home – Warm Wishes Pour In from Fans
VIDEO : जीवा-काव्याच्या नात्यात दुरावा; छातीवरचा टॅटू मिटवला, 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत नवा ट्विस्ट

विवेकच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, त्याने २००९ साली अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. यानंतर २०१६ मध्ये लव लग्न लोचा या मालिकेतून मनोरंजन क्षेत्रात पहिले पाऊल टाकले. या मालिकेतील त्याच्या राघवेंद्र या भूमिकेने तो प्रेक्षकांच्या घरात पोहोचला. यानंतर त्याने आई माझी काळू बाई व भाग्य दिले तु मला या मालिकेतून चांगली ओळख मिळवली. आता तो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत अभिनेत्री मृणाल दुसानिससह मुख्य भुमिकेत आहे.

TV Star vivek sangle Enters New Home – Warm Wishes Pour In from Fans
Lagnanantar Hoilach Prem : लग्नानंतर प्रेम फुलणार का? जीवा-नंदिनी अन् पार्थ-काव्याच्या नात्याची नवी इनिंग, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com