Kunal Kamra: कुणाल कामराला हाय कोर्टचा दिलासा; अटक नाही होणार, पण...

Kunal Kamra Row: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी कुणाल कामराला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
kunal kamra Controversy
kunal kamra ControversySaam Tv
Published On

Kunal Kamra Row: प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'गद्दार' अशी टिप्पणी केल्याबद्दलच्या खटल्यात न्यायालयाने कुणालला अटकेपासून संरक्षण दिले. तथापि, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'गद्दार' वक्तव्यासंदर्भात दाखल केलेल्या एफआयआरच्या चौकशीला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला.

काय प्रकरण आहे?

कुणाल कामराने सोशल मीडियावर एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप होता, त्यानंतर मुंबईतील खार पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. अटक टाळण्यासाठी कुणालने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

kunal kamra Controversy
Riteish Deshmukh Movie: रितेश देशमुखच्या चित्रपटातील डान्सर तरूण नदीत बुडाला; २ दिवसांनी सापडला मृतदेह

न्यायालयाने काय म्हटले

कुणालची याचिका स्वीकारताना, न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि एस.एम. मोडक यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, "याचिकेची सुनावणी प्रलंबित होईपर्यंत याचिकाकर्त्याला (कुणाल) अटक केली जाणार नाही. चौकशी सुरू राहू शकते." जर पोलिसांना कुणालचा जबाब नोंदवायचा असेल तर तो चेन्नईमध्येच नोंदवावा, जिथे तो राहतो, असे न्यायालयाने निर्देश दिले. यासाठी पोलिसांना आधी कुणालला कळवावे लागेल. या कालावधीत पोलिसांनी या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले तर संबंधित न्यायालय त्यावर पुढील कोणतीही कारवाई करणार नाही, असा आदेशही न्यायालयाने दिला. कुणालने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पोलिसांच्या चौकशीसाठी उपलब्ध राहण्याचेही मान्य केले होते. गेल्या आठवड्यात न्यायालयाने याचिकेवरील निर्णय राखून ठेवताना कुणालला अंतरिम संरक्षण दिले होते.

kunal kamra Controversy
Sara Ali Khan: एकीकडे श्रद्धांजली, तर दुसऱ्या बाजूला काश्मीर ट्रिपचे फोटो; सारा अली खानच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगला सुरुवात

कुणाल कामराची बाजू

कुणाल कामरा हा त्याच्या व्यंग्यात्मक विनोदासाठी आणि स्पष्ट टिप्पण्यांसाठी ओळखला जातो. या प्रकरणात त्यांनी असा दावा केला की त्याच्या टिप्पण्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेत आहेत आणि त्या विनोद म्हणून घेतल्या पाहिजेत. न्यायालयाने तपास रद्द करण्याची त्याची मागणी फेटाळली असली तरी, अटकेपासून संरक्षण देऊन त्याला तात्काळ दिलासा दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com