संचिता उगलेने राहत्या घरी आत्महत्या केली.
संचिता उगलेची शेवटची पोस्ट व्हायरल
वयाच्या 30 व्या वर्षी अभिनेत्रीने आयुष्य संपवलं
टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगलेने रविवारी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. मीडिया रिपोर्टनुसार, रविवारी संध्याकाळी अभिनेत्रीने आपले आयुष्य संपवले. अभिनेत्रीच्या मृत्यूने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्रीने वयाच्या 30 व्या वर्षी आत्महत्या केली. अभिनेत्रीच्या निधनानंतर तिची इंस्टाग्रामवरील शेवटची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्रीने आत्महत्या करण्यापूर्वी काही तास ही रील शेअर केली होती.
संचिता उगले आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये खूपच आनंदी दिसत आहे. व्हिडीओत अभिनेत्री 'डफलीवाले डफली बजा...' आणि 'राधा तेरी चुनरी...' या गाण्यावर नाचताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव तिचा आनंद व्यक्त करत आहेत. रीलसाठी अभिनेत्रीने गुलाबी अनारकली सूट परिधान केला आहे. कपाळावर बिंदी, कानात झुमके आणि हातात बांगड्या घालून अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. या एथनिक लूकमध्ये तिने कॅमेरा हातात घेऊन एक सेल्फी व्हिडिओ बनवला आहे.
अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर आनंद आणि हास्य पाहायला मिळत आहे. गाण्याच्या पार्श्वभूमीवर काही आवाजही ऐकू येत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिलं की, "मैं नाचूं, तू नचा..." या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एवढ्या आनंदी दिसणाऱ्या मुलीने अचानक जगाचा निरोप घेतल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला. व्हिडीओवर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. एका युजरने लिहिलं की, "संचिता तू असं का केलंस?" तर दुसऱ्या युजरने लिहिलं, "ती तिच्या आयुष्यात खूप आनंदी दिसत होती, असे वाटत होते की, ती तिचे आयुष्य खूप छान जगत आहे...असं अचानक काय झालं?" अशा अनेक कमेंट्स व्हिडीओवर येत आहेत.
संचिता उगले मनोरंजन विश्वाचा प्रसिद्ध चेहरा आहे. तिने विकी कौशलच्या 'छावा'चित्रपटातही काम केले आहे. तसेच तिची 'कुमकुम भाग्य' ही मालिका खूप गाजली. संचिताच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.