Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar: 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार!' च्या मंचावरील सर्वात लहान कीर्तनकाराचे आगमन

Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar: सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार' च्या मंचावर वेगवेगळ्या वयोगटाचे अनेक स्पर्धक सहभागी झाले आहेत.
Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar
Kon Honar Maharashtracha Ladka KirtankarSaam Tv
Published On

Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar: सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार' च्या मंचावर वेगवेगळ्या वयोगटाचे अनेक स्पर्धक सहभागी झाले आहेत. या सहभागी स्पर्धकांमध्ये सर्वात लहान स्पर्धकही आली आहे, जिने आपल्या कीर्तनातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कीर्तनकारांना उत्तम व्यासपीठ मिळून देणारा हा मंच आणि सहभागी स्पर्धक यांची चांगलीच चर्चा रंगली आहे.

कीर्तनाची गोडी । देव निवडी आपण ।। कोणी व्हारे अधिकारी । त्यासी हरी देईल ।। आंगी वैराग्याचे बळ । साही खळ जिणावे ।। उरेल ना उरी । तुका करी बोभाट ।। तुकाराम महाराज म्हणतात, देव स्वतःहून कीर्तन करणाऱ्यांच्या कीर्तनात गोडी आहे की नाही ते ठरवितो व गोडी मिळाल्यास तेथे स्वतःजातीने हजर राहतो अन्यथा नाही. आजवर प्रत्येकाने कीर्तन ऐकलं असेल मात्र बंजारी भाषेत कीर्तन हे ऐकून सगळ्यांच्या भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत.

Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar
Krrish 4: क्रिश ४ मध्ये टाइम ट्रॅव्हलचा ट्विस्ट! हृतिक साकारणार तिहेरी भूमिका, 'कोई मिल गया' मधील 'या' पात्राची होणार रिएन्ट्री

सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार!' च्या मंचावर सर्वात चिमुरड्या १२ वर्षीय ह.भ. प. यशस्वीताई आडे महाराजांचं बंजारा भाषेतलं कीर्तन ऐकण्याची सुवर्णसंधी या शो च्या निमित्ताने महाराष्ट्राला उपलब्ध झाली आहे. घरातील धामिर्क कार्यक्रमांमुळे ह. भ. प. यशस्वीताई आडे लहानपणापासूनच कीर्तनाची गोडी लागली. या मंचावर ह.भ प. यशस्वीताई आडे यांनी बंजारा भाषेतील संत सेवालाल यांचं कीर्तन करून उपस्थित प्रेक्षक आणि परीक्षकांना मंत्रमुग्ध केलं. ‘छोटी मुक्ताई’ असा गौरव परीक्षकांनी यावेळी केला. संत नामदेवांचं कीर्तनही तिने यावेळी सादर केलं . गुरुवारी हा भाग प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar
Raid 2: इलियानाऐवजी वाणी कपूर करणार लीड रोल? अजय देवगण स्पष्टच बोलला...

केवळ भाषेच्या बंधनात अडकून न राहता कीर्तनाचा प्रसार आणि प्रचार वेगवगळ्या भाषांच्या माध्यमातून होत ज्या वयात मनसोक्त खेळायचं, बागडायचं, आईवडिलांकडे हट्ट करायचा असं ह.भ.प. यशस्वीताई आडे हिचं वय. मात्र, ही चिमुरडी आज आपल्या रसाळ वाणीतून वारकरी संप्रदायाची महती साता समुद्रापार पोहचावी यासाठी प्रयत्न करतेय. 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार...' हा रिअ‍ॅलिटी शो सोमवार ते शनिवार, रात्री ८.०० वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com