Krrish 4: क्रिश ४ मध्ये टाइम ट्रॅव्हलचा ट्विस्ट! हृतिक साकारणार तिहेरी भूमिका, 'कोई मिल गया' मधील 'या' पात्राची होणार रिएन्ट्री

Krrish 4 Movie Update: हृतिक रोशनच्या क्रिश ४ या चित्रपटाच्या कथेत एक टाइम ट्रॅव्हल ट्विस्ट असेल, हृतिक रोशन या चित्रपटात तिहेरी भूमिका साकारताना दिसू शकतो.
Hrithik Roshan Krrish 4
Hrithik Roshan Krrish 4Saam Tv
Published On

Krrish 4: ​बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन लवकरच 'क्रिश 4' या बहुप्रतिक्षित चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात त्याचा तिहेरी भूमिका असणार आहे, ज्यात तो नायक आणि खलनायक दोन्ही भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाची कथा टाइम ट्रॅव्हल म्हणजेच काळाच्या प्रवासावर आधारित असून, यात 'कोई मिल गया' मधील जादू या लोकप्रिय एलियनचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. ​

चित्रपटाच्या कथानकात क्रिशला भूतकाळ आणि भविष्यकाळात प्रवास करत एका मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. या रोमांचक कथानकासाठी हायलेव्हल VFX आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. तसेच, चित्रपटात इमोशनल स्टोरी देखील पाहायला मिळणार आहे.

Hrithik Roshan Krrish 4
Raid 2: इलियानाऐवजी वाणी कपूर करणार लीड रोल? अजय देवगण स्पष्टच बोलला...

'क्रिश 4' मध्ये प्रीती झिंटा, प्रियंका चोप्रा, विवेक ओबेरॉय आणि रेखा यांसारख्या जुन्या कलाकारांची पुनरागमन होण्याची शक्यता आहे. तसेच, नोरा फतेही हिचीही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका असू शकते, ज्यात तिचे काही अॅक्शन सीक्वेन्सेस असतील. ​

Hrithik Roshan Krrish 4
Sushant Singh Rajput Case: सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; कोर्टाने दिले महत्वाचे आदेश

चित्रपटाच्या पटकथेचे काम पूर्ण झाले असून, ऋतिक रोशन आणि राकेश रोशन यांनी त्यावर अंतिम मान्यता दिली आहे. चित्रपटाचे शूटिंग फेब्रुवारी किंवा मार्च 2024 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com