Sushant Singh Rajput Case: सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; कोर्टाने दिले महत्वाचे आदेश

Sushant Singh Rajput Case: गेल्या महिन्यात सीबीआयने अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाबाबत क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. यासंदर्भात आज वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात सुनावणी झाली.
Sushant Singh Rajput Case
Sushant Singh Rajput CaseSaam Tv
Published On

Sushant Singh Rajput Case: मुंबईतील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने आज ८ एप्रिल रोजी केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टची सुनावणी नियुक्त न्यायालयाकडे हस्तांतरित करण्याची परवानगी दिली आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात सीबीआयने गेल्या महिन्यात वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात आपला क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमध्ये, दोन्ही एफआयआरमध्ये नाव असलेल्या सर्व लोकांना निर्दोष ठरवण्यात आले आहे.

विशेष न्यायालयात सुनावणी होणार

अभिनेता सुशांत सिंह राजपूत १४ जून २०२० रोजी मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. सीबीआयने त्यांच्या अहवालात म्हटले होते की, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) च्या फॉरेन्सिक तज्ज्ञांनी सीबीआयला दिलेल्या रिपोर्टनुसार सुशांत सिंग राजपूत याच्यावर विषप्रयोग आणि गळा दाबल्याचे दावे चुकीचे आहेत.

Sushant Singh Rajput Case
Guhagar Tourism: 'उंची माडांची जवळून मापवा...'; उन्हाळ्याच्या सुट्टीत गुहागरच्या 'या' ठिकाणी नक्की भेट द्या

मंगळवारी, एजन्सीने मॅजिस्ट्रेट केसी राजपूत यांना कळवले की ते मुख्य न्यायिक दंडाधिकाऱ्यांसमोर खटल्याची सुनावणी एस्प्लेनेड मॅजिस्ट्रेट कोर्टात हस्तांतरित करण्यासाठी अर्ज सादर करतील, केसी राजपूत यांना सीबीआय प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी नियुक्त केले गेले आहे.

Sushant Singh Rajput Case
Ground Zero Trailer: 'कश्मिर का बदला लेगा फौजी...'; अंगावर शहारा अणणारा 'ग्राउंड झिरो'चा ट्रेलर प्रदर्शित

रिया चक्रवर्तीने राजपूतची बहीण प्रियंका आणि एका डॉक्टरविरुद्ध तक्रार दाखल केली होती आणि आरोप केला होता की ते अभिनेत्याच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत. सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमुळे, या प्रकरणात आरोपी मानल्या गेलेल्या रियाला क्लीन चिट मिळाली आहे. या प्रकरणी अभिनेत्रीला तुरुंगातही जावे लागले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com