Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar:'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार'च्या मंचावर कीर्तनात तल्लीन झाले प्रवीण तरडे

Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar Show: मराठी संस्कृतीचा वारसा जपणारा ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा नवा रिअ‍ॅलिटी शो सुरु झाला असून यामध्ये प्रवीण तरडे उपस्थित राहणार आहेत.
Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar
Kon Honar Maharashtracha Ladka KirtankarSaam Tv
Published On

Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar: लोकप्रिय मराठी अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे... आपल्या मातीशी आणि संस्कृतीशी नाळ जोडून असलेलं अभ्यासू व्यक्तिमत्त्व...! नव्या उमद्या कलाकारांना कायमच प्रोत्साहन देणारे प्रवीण तरडे यांच्यामुळे सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार'चा मंच गाजणार आहे आणि कीर्तन जोरदार रंगणार आहे. येत्या शनिवारी या रिअ‍ॅलिटी शोमध्ये विशेष पाहुणे म्हणून प्रवीण तरडे उपस्थित राहून कीर्तनकारांना प्रोत्साहन देणार आहेत.

या वेळी उपस्थित कीर्तनकारांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन देताना महाराष्ट्राचा डीएनए हा कीर्तनाचा आहे, असं प्रतिपादन त्यांनी केलं. ‘फुटो हे मस्तक तुटो हे शरीर । परी नामाचा गजर सोडू नको रे ।।' असं सांगत सहभागी कीर्तनकारांचं कौतुक त्यांनी केलं. हे सादरीकरण मला थक्क करणारं असून मराठी मातीशी, संस्कृतीशी आणि मराठी मनाशी थेट जोडणारा हा रिअ‍ॅलिटी शो सोनी मराठी वाहिनीनं आणल्याबद्दल त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी असल्याचंही प्रवीण तरडे म्हणाले.

Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar
Chhorii 2 Trailer: 'एक घंणा बड़ा राज्य था...'; अंगावर काटा आणणारा 'छोरी २' चा भयानक ट्रेलर प्रदर्शित

'आजवर अनेक पुरस्कार मला मिळाले पण या मंचावर उपस्थित राहण्याची संधी सोनी मराठी वाहिनीनं मला दिली हा माझ्यासाठी सर्वोच्च पुरस्कार आहे. या पुरस्कारानं माझे आईवडीलही नक्कीच सुखावले असणार. आज आपल्याला समाजप्रबोधनाची नितांत गरज आहे. या रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून ही गरज पूर्ण होते आहे याचा आनंद आहे.

Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar
Chhorii 2 Trailer: 'एक घंणा बड़ा राज्य था...'; अंगावर काटा आणणारा 'छोरी २' चा भयानक ट्रेलर प्रदर्शित

हा रिअ‍ॅलिटी शो प्रत्येकाचा लाडका होणार आहे. हा शो अखंड चालू राहायला हवा', त्याची अनेक पर्वं व्हायला हवीत, अशा शुभेच्छा त्यांनी या प्रसंगी दिल्या. 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार...' हा रिअ‍ॅलिटी शो सोमवार ते शनिवार, रात्री ८.०० वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com