Kartik Aaryan And Sara Ali Khan News: ‘....पण ही गोष्ट सोप्पी नव्हती’; कार्तिक आर्यनसोबतच्या ब्रेकअपवर सारा अली खानने सोडलं मौन

Koffee With Karan Season 8 Latest Episode: अनन्या पांडे आणि सारा अली खान या दोघी स्टारकिड्सने ‘कॉफी विथ करण’च्या आजच्या एपिसोडमध्ये हजेरी लावली आहे.
Kartik Aaryan And Sara Ali Khan News
Kartik Aaryan And Sara Ali Khan NewsInstagram
Published On

Ananya Pandey And Sara Ali Khan News

सध्या सोशल मीडियावर ‘कॉफी विथ करण’च्या आठव्या सीझनची प्रचंड चर्चा होत आहे. आज (गुरुवारी) टेलिकास्ट होणाऱ्या या शोमध्ये अनन्या पांडे आणि सारा अली खान या दोघीही स्टारकिड्स हजेरी लावणार आहेत. यावेळी शोमध्ये दोघींनीही अनेक महत्वाचे खुलासे केले आहेत. अनन्या आणि साराने आपल्या खासगी आयुष्यावर भाष्य केले आहे. शोच्या सुरुवातीलाच या दोघीही कोणत्या बॉलिवूड अभिनेत्याला एकत्र डेट करत आहेत?, याबद्दल करण जोहरने सांगितले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kartik Aaryan And Sara Ali Khan News
Payal Ghosh: मी तुझ्याशी लग्न करायला तयार, पण...; प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोहम्मद शमीला प्रपोज

कायमच करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा शो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहतो. यावेळी ही शो चर्चेत आला आहे. नुकतंच करणने अनन्या आणि साराला थेट कार्तिक आर्यनबद्दल प्रश्न विचारला आहे. करणने सारा आणि अनन्याला, ब्रेकअपनंतर एकमेकींसोबत मैत्री करणे सोपे आहे का?, कारण तुम्ही दोघींनीही एकाच मुलाला एकत्रित डेट केले आहे. तर तुमच्यासाठी ती गोष्ट सोप्पी होती की अवघड होती? यावर साराने उत्तर दिले आहे. (Bollywood)

“ही गोष्ट आमच्यासाठी सोप्पी नव्हती, ही गोष्ट बोलताना खूपच विचित्र वाटते. पण हे खरंच सोप्पे नव्हते. जेव्हा तुम्ही एखाद्यासोबत रिलेशनमध्ये राहतात. मग ते मित्र म्हणून, प्रोफेशनल म्हणून किंवा रोमँटिक असो. जर मी असेल, तर मी नात्यात पूर्णपणे गुंतते आणि गुंतवणूक करते. हे खरंच असेल असे नाही. यामुळे मला कोणताही फरक पडू शकत नाही. आजची परिस्थिती एक गोष्ट असू शकते आणि उद्या ती काहीतरी वेगळी असू शकते. त्या गोष्टीचा तुमच्यावर परिणाम होतो. पण शेवटी तुम्हाला त्यातून पुढे जावे लागेल.” असं सारा म्हणाली. (Bollywood News)

Kartik Aaryan And Sara Ali Khan News
Girish Karnad On Neena Gupta: ‘तू कधीच हिरोईन होणार नाहीस’, दिग्गज अभिनेत्याने नीना गुप्ता यांना स्पष्ट सांगितलं होतं

“इंडस्ट्रीमध्ये कोणीतरी तुमचा कायमचा मित्र राहील किंवा तुम्ही कधीही कोणासोबत बोलणार नाही, असं म्हणणे शहाणपणाचे नाही. या इंडस्ट्रिमध्ये कोणतीही मैत्री लाईफटाईमसाठी टिकत नाही आणि शत्रुत्व सुद्धा नाही. कधी नं बोलणाऱ्या व्यक्तीही तुमच्यासोबत अचानकपणे बोलू शकतात. सारा अली खानने यावेळी मुलाखतीत लोकांमधील मैत्री परिस्थितीनुसार बदलत राहते, असे देखील स्पष्ट केले.” असं मुलाखतीमध्ये सारा म्हणाली. (Actress)

सारा अली खान आणि कार्तिक आर्यनने अनेक वर्ष एकमेकांना एकत्र डेट केले होते. मात्र, काही दिवसांनंतर त्यांचे ब्रेकअप झाले. अनन्या पांडेही आधी कार्तिक आर्यनला डेट करायची. त्यानंतर ती आता आदित्य रॉय कपूरला डेट करते.

Kartik Aaryan And Sara Ali Khan News
Brazilian Singer: धक्कादायक! प्रसिद्ध गायकाचा कोळी चावल्यामुळे मृत्यू... जाणून घ्या नक्की काय आहे प्रकार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com