Khushi Mukherjee: सोशल मीडियावर विचित्र आणि वल्गर स्टाईलमुळे चर्चेत असलेल्या खुशी मुखर्जीने अलीकडेच खुलासा केला की क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव तिला मेसेज करायचा. अभिनेत्रीने असेही म्हटले आहे की अनेक क्रिकेटपटूंनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. या विधानामुळे ती लगेचच चर्चेत आली. बरेच लोक खुशीची तुलना उर्फी जावेदसोबत करु लागले. पण यावेळी खूशीने हद्द पार करत नकोते कपडे घालून मिडीयासमोर आली.
खुशी मुखर्जीचा आऊटफिट
अलिकडेच खुशी मुखर्जीने वल्गर आऊटफिट घातला होता. या आऊटफिटमुळे पापाराझींसाठी पोज देताना ती खूप जास्त अस्वस्थ दिसली. या आऊटफिटमुळे सोशल मीडियावर खळबळ उडालीच पण यामुळे खूशी मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. तीने या आऊटफिटमध्ये काळ्यारंगाचा गोल्डन बॉर्डर असलेला एक कापड घातला होता पण तो कापड हाताच्या दोन्ही बाजूने उघडा होता. यामुळे खूशीचं संपूर्ण शरीर दिसत होतं. या आऊटफिटमुळे नेटकरी संतापले आहेत.
खुशी मुखर्जी ट्रोल
खुशी मुखर्जीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती तिच्या कारमधून काळ्या रंगाचा पोशाख घालून बाहेर पडते, जो दोन्ही बाजूंनी फाटलेला आहे, फक्त तिच्या शरीराचा पुढचा आणि मागचा भाग झाकलेला आहे. या पोशाखात खुशी मुखर्जीला पाहून सोशल मीडिया वापरकर्ते संतापले. एका नेटकऱ्याने कमेंट केली, "प्रसिद्धी मिळवण्यासाठी जग काय करत नाही?" दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, "उर्फी जावेद देखील तिच्यासमोर फेल ठरली." दुसऱ्या नेटकऱ्याने विचारले, "ते काय आहे? लाज वाटत नाही का...?
खुशी मुखर्जी कोण आहे?
खुशी मुखर्जीच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवरून ती एक अभिनेत्री आणि इन्फ्लुएंसर असल्याचे दिसून येते. ती यापूर्वी अनेकदा पापाराझींसमोर विचित्र आऊटफिटमध्ये दिसली आहे. राखी सावंतनेही या अभिनेत्रीला ट्रोल केले आहे. ती अनेक रिअॅलिटी शोमध्येही दिसली आहे. पण, ती तिच्या आऊटफिटमुळे नेटकरी तिला अनेक वेळा ट्रोल करतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.