Katrina-Vicky Son: बॉलिवूडमध्ये दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र, यंदाच्या दिवाळीत सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी. या कपलने दिवाळीच्या खास मुहूर्तावर पहिल्यांदाच आपल्या मुलगा विहानची झलक चाहत्यांना दाखवली आहे. त्यांचा हा सुंदर कौटुंबिक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक खास कौटुंबिक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही जमिनीवर बसलेले दिसत असून त्यांच्यामध्ये त्यांचा लाडका मुलगा विहान उभा आहे. विहान दोन्ही हात हवेत उंचावून खळखळून हसताना दिसत आहे. तर कतरिना आणि विकी त्याला दोन्ही बाजूंनी प्रेमाने धरून आहेत. या फोटोमधील तिघांचाही लूक उत्तम आहे. विशेष म्हणजे, या फोटोच्या माध्यमातून कतरिना आणि विकीने पहिल्यांदाच मुलाचा चेहरा दाखवला आहे.
या फोटोसोबत कतरिना आणि विकीने खास कॅप्शनही लिहिले आहे. 'आमची आतापर्यंतची सर्वात उज्वल दिवाळी... सर्वांना प्रेम, प्रकाश आणि आनंदाच्या शुभेच्छा,' अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. या कॅप्शनमधून मुलगा विहानसोबतची ही दिवाळी त्यांच्यासाठी किती खास आहे, हे दिसून येते.
या कौटुंबिक फोटोमध्ये कतरिना कैफने पिवळ्या रंगाचा सुंदर सूट परिधान केला आहे. या सूटच्या कडा आणि बाजूंना असलेले सोनेरी नक्षीकाम तिच्या लूकला अधिक आकर्षक बनवत आहे. मोकळे केस आणि साधे दागिने यामुळे तिचा लूक अगदी एलिगंट दिसत आहे. दुसरीकडे, विकी कौशलने क्रीम रंगाचा कुर्ता-पायजमा परिधान केला आहे. कुर्त्याच्या कॉलर आणि पुढील भागावर असलेले सोनेरी नक्षीकाम त्याच्या लूकला खास बनवत आहे. या फोटोमध्ये छोट्या विहानचा लूकही विशेष चर्चेत आहे. त्याने क्रीम रंगाचा कुर्ता-पायजमा आणि त्यावर गडद पिवळ्या रंगाचे जॅकेट घातले आहे. आई-वडिलांच्या कपड्यांशी मिळताजुळता त्याचा हा लूक खूपच गोड दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.