Kartik Aaryan: कार्तिक आर्यनला दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्याची इच्छा केली व्यक्त, करणार 'या' चित्रपटात काम

कार्तिक आर्यनने साऊथ चित्रपटांमध्ये पदापर्ण करणार असल्याचे सांगितले आहे.
Kartik Aaryan On His debut in South Movie
Kartik Aaryan On His debut in South MovieSaam Tv
Published On

Kartik Aaryan South Debut: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या फ्रेडी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. फ्रेडीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कार्तिक आता त्याच्या नवीन चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. दरम्यान कार्तिक आर्यनने साऊथ चित्रपटांमध्ये पदापर्ण करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच त्याने कोणत्या भाषेत काम करणार आहे हेही सांगितले आहे.

Kartik Aaryan On His debut in South Movie
Hansika-Sohail Video: आफ्टर वेडिंग पार्टीत हंसिका-सोहेलने धरला ठेका, हुक स्टेप्सने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले

एका मुलाखतीदरम्यान कार्तिक म्हणाला की, मी कोणत्याही भाषेतील चित्रपटामध्ये काम करण्यास तयार आहे. परंतु मी कोणत्या भाषेतील चित्रपटामध्ये काम करणार हे त्या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर अवलंबून आहे. माझी तर तामिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा आहे. माझ्यापेक्षा कोणीच ही भूमिका अधिक चांगली करू शकत नाही, असा विश्वास मी माझ्या चित्रपटही अभिनयाच्या माध्यमातून निर्मात्यांमध्ये तयार करण्याचा प्रयत्न करत असतो. (Actor)

कार्तिक आर्यन यशस्वी कलाकारांपैकी एक आहे. कार्तिक आर्यनला नेहमीच टॉपचा अभिनेता बनायचे होते. बॉलिवूडमध्ये स्वतःच्या हिंमतीवर आपले वेगळे स्थान त्याला निर्माण करायचे होते. कार्तिकला चित्रपट निर्मात्यांची पहिली निवड व्हायचे आहे. कार्तिकचे म्हणणे आहे की, तो त्याच्या इच्छित स्थानी लवकरच पोहोचेल, जिथे त्याला पोहोचायचे आहे. येत्या काळात लोक फक्त त्यालाच मोठ्या पडद्यावर पाहतील. (Bollywood)

ओटीटीवर प्रदर्शित झालेला त्याचा चित्रपट फ्रेडी लोकांच्या पसंतीस उतरत आहे. कार्तिक आर्यन 'शहजादा', 'सत्यप्रेम की कथा', 'आशिकी थ्री' आणि 'कॅप्टन इंडिया' या त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये दिसणार आहे. (Movie)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com