Shocking : मैत्रिणीच्या लग्नातील डान्स शेवटचा ठरला; नाचता नाचता अभिनेता खाली कोसळला, हसवणारा चेहरा रडवून गेला

kannada tv actor rakesh poojary death : नाचता नाचता प्रसिद्ध अभिनेता जमीनीवर खाली कोसळला. या अभिनेत्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
rakesh poojary News
rakesh poojary death Saam tv
Published On

मनोरंजन सृष्टीतून दुखद घटना समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन झालं आहे. कन्नड टीव्ही अभिनेता राकेश पुजारीचं सोमवारी म्हणजे १२ मे रोजी सकाळी निधन झालं. वयाच्या ३४ व्या वर्षी राकेश पुजारीने जगाचा निरोप घेतला. राकेश पुजारीचा हृदयाचा झटक्याने मृत्यू झाला. तेो प्रसिद्ध कॉमेडियन देखील होता.

rakesh poojary News
Navneet Rana : हिंदू वाघीण...तू आता काही दिवसांची पाहुणी; नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी

मैत्रिणीच्या लग्नात नाचताना आला हार्टअॅटक

राकेशला कोणताही आजार नव्हता. राकेशचं रात्री २ वाजता निधन झालं. अभिनेता राकेश पुजारी ११ मे रोजी उडुपी जिल्ह्यात मैत्रिणीच्या लग्नात सहभागी झाला होता. राकेश हा मैत्रीण पूजा नितेजच्या मेहंदी सोहळ्यात सहभागी झाला होता. या सोहळ्यात नाचताना राकेशला हृदयाचा झटका आला. रक्तदाब कमी झाल्याने राकेशला हृदयाचा झटका आला. त्यानंतर रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी राकेशला मृत घोषित केले.

rakesh poojary News
india pakistan tensions : शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताचं प्रत्युत्तर; हवाई दलाचा पाकला इशारा, सीमेवर नेमकं काय घडलं?

राकेश पुजारी याच्या निधनाच्या वृत्ताला अभिनेता शिवराज केआर पीटने दुजोरा दिला आहे. अभिनेता शिवराजने पोस्ट शेअर करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. राकेशचा फोटो पोस्ट करत शिवराजने इन्स्टाग्राम हँडलवर भावुक पोस्ट लिहित श्रद्धांजली वाहिली आहे.

कुटुंबाला मोठा धक्का

राकेश पुजारीने अनेक कन्नड टीव्ही मालिकेत काम केलं आहे. 'कॉमेडी खिलाडीलु सीझन ३ ' जिंकल्यानंतर राकेशला प्रसिद्धी मिळाली. राकेशला कन्नड सिनेमात अभिनेता म्हणून काम करायचं स्वप्न होतं. मात्र, राकेशचं अचानक निधन झाल्याने त्याचे चाहते आणि कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. राकेशच्या पश्चात त्याची आई आणि लहान बहीण असा परिवार आहे. दोघांना सोडून राकेश पुजारीने अकाली जगाचा निरोप घेतला आहे.

rakesh poojary News
Chhatrapati Shivaji Maharaj : राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण; काय आहेत प्रमुख वैशिष्ट्ये? वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com