Navneet Rana : हिंदू वाघीण...तू आता काही दिवसांची पाहुणी; नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी

Navneet Rana News : अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी मिळाली आहे. फोनवरून त्यांना धमकी मिळाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Navneet Rana News
Navneet Rana Saam tv
Published On

भाजप आणि पाकिस्तानदरम्यान तणाव कायम आहे. युद्धविरामानंतर दोन्ही देशातील वरिष्ठांमध्ये चर्चा सुरु आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. तर त्यांचे ३५ सैनिक मारले गेले. दोन्ही देशातील तणावादरम्यान माजी खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. नवनीत राणा यांना फोनवरून धमकी मिळाली आहे. 'हिंदू वाघीण...तू काही दिवसांची पाहुणी आहे. तुला लवकरच संपवू. आता सिंदूर आणि सिंदूर लावणारी देखील वाचणार नाही, अशी धमकी देण्यात आली आहे. माजी खासदाराला वेगवेगळ्या क्रमाकांवरून धमकी मिळाली आहे.

पाकिस्तानातून फोन आल्यानंतर नवनीत राणा यांनी खार पोलिसांत माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. नवनीत राणा यांना याआधी देखील धमक्या मिळाल्या आहेत. नवनीत राणा यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर आक्रमक विधाने केली होती.

Navneet Rana News
india pakistan conflict : पाकिस्तानात सत्तापालट होणार? ट्रम्प यांची मध्यस्थी, पाकने धुडकावली, वाचा स्पेशल रिपोर्ट

नवनीत राणा यांनी म्हटलं होतं की, 'त्यांनी घरात घुसून मारलं, आता त्यांचासाठी स्मशानात खड्डा खोदला आहे. देशाच्या गादीवर तुमचा बाप बसला आहे'. सोशल मीडियावरूनही त्यांनी पाकिस्तानच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. 'सिंदूरचा बदला सिंदूरने घेऊ. जय हिंद, जय भारत, अशी पोस्ट त्यांनी लिहिली होती.

Navneet Rana News
Operation Sindoor : १०० दहशतवाद्यांचा खात्मा, ९ दहशतवादी तळांवर हल्ला, कसाबचं ट्रेनिंग कॅम्प उद्धवस्त; सैन्य दलाकडून A टू Z माहिती, वाचा

भारताकडून पहलगाम हल्ल्याचा बदला

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी ४ दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. तर १७ पर्यटक जखमी झाले होते. यानंतर भारतीय सैन्याने ६ आणि ७ मे रोजी मध्यरात्री पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक केला होता. एअर स्ट्राइकच्या हल्ल्यात १०० हून अधिक जणांचा खात्मा झाला. हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने सीमेवर गोळीबार केला. एलओसीजवळून काही राज्यात ड्रोन आणि मिसाइलने हल्ला केला. मात्र, भारतीय सैनिकांनी पाकिस्तानचे ड्रोन पाडले.

Navneet Rana News
india pakistan tensions : शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताचं प्रत्युत्तर; हवाई दलाचा पाकला इशारा, सीमेवर नेमकं काय घडलं?

कोण आहेत नवनीत राणा?

नवनीत राणा २०१९ साली महाराष्ट्रातील अमरावती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आल्या होत्या. मात्र, २०२४ साली राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना धूळ चारली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com