Marathi compulsory: 'मराठी बोलायला लाज का वाटते?'; 'कमळी'फेम अभिनेत्रीचा थेट सवाल, VIDEO व्हायरल

Marathi compulsory: कमळी फेम सुषमा जयवंतने मराठी सक्तीच्या निर्णयावर प्रतिक्रिया देत एक व्हिडिओ शेअर केला आहे. मराठी बोलण्याची लाज का वाटते, असा सवाल करणारा तिचा व्हिडीओ चर्चेत आला.
Marathi compulsory
Marathi compulsorySaam tv
Published On

Marathi compulsory: राज्यात १ मेपासून परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘कमळी’ मालिकेतून प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री सुषमा जयवंत हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत या विषयावर आपलं मत मांडलं आहे.

सुषमा जयवंतने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती म्हणते की, “नमस्कार मी सुषमा जयवंत. एक मुद्दा मी आता बघितला. तुम्ही यूपीवाल्यांना जर मराठी येत नसेल, तर गाडी चालवून देणार नाही. खूप छान; पण जेव्हा ते परवाना घ्यायला येतात तेव्हा सरकारकडून किंवा त्यांना जो परवाना मिळतो, तो दिलाच का जातो? तेव्हा का कुणी सक्ती करत नाही. दुसरा प्रश्न, भाजी विकणारा भैय्या असो किंवा तो एखादा रिक्षावाल्याला ‘तुम यहां पे आओगे क्या? ये भाजी कितने मे दी?’ हे बोलणारा मराठी माणूस आहे ना, त्याला तुम्ही पहिली सक्ती करा. तुम्ही स्वत: पहिल्यांदा मराठीत बोला. आपण मराठी बोलायची लाज बाळगतो आणि आपण इतरांना सांगतो की मराठी बोला. काय लॉजिक आहे? तुम्ही आपल्या मुलांना किती मराठी माध्यमात शिकायला पाठवत आहात?

Marathi compulsory
Marathi compulsory: 'आमच्या भाषेच्या विरोधात रस्त्यावर येत असाल, तर…'; अमराठी रिक्षाचालकांवर संतापला आणखी एक मराठी अभिनेता

मराठी प्रेक्षकांना आवाहन करत ती पुढे म्हणाली, 'भाषेचं बंधन असणं-नसणं मला कळत नाही. पण हे जे काही ‘तू गलत है, तू गलत है’ चाललंय, त्यात तूपण चुकीचाच आहेस. याच्याबद्दल विचार करा आणि याच्याबद्दल नक्की मत मांडा. मला नक्कीच चर्चा करायला आवडेल'

Marathi compulsory
Marathi compulsory: मराठी शिकायचीच नसेल तर निघा; मराठमोळ्या गायकाचा परप्रांतियांना स्पष्ट शब्दात सल्ला

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी येणं आवश्यक ठरणार आहे. मात्र, या निर्णयावर काही चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत सुषमा जयवंतने या मुद्द्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचं आवाहन केलं आहे. ती म्हणते की, कोणतीही भाषा शिकणं चुकीचं नाही, पण आपल्या मातृभाषेला कमी लेखणं अयोग्य आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com