Filmfare Award Marathi 2022: फिल्मफेअरमध्ये 'गोदावरी'ने मारली बाजी; पटकावले 'हे' पुरस्कार

Godavari Marathi Movie: 'गोदावरी' चित्रपटाला ५ 'फिल्मफेअर पुरस्कार' मिळाले आहेत.
Godavari Marathi Movie win the best film award at Filmfare award marathi 2022
Godavari Marathi Movie win the best film award at Filmfare award marathi 2022Saam Tv

Jitendra Joshi Movie Won Best Film Award: सध्या सिनेसृष्टीत पुरस्कार सोहळ्याची रेलचेल सुरू आहे. ऑस्कर सोहळ्याची रंगच संपत नाही तोवर देशात इतर अनेक मोठं-मोठे पुरस्कार सोहळा पार पडले. झी चित्रगौरव, कलर्स मराठी, सोनी मराठी या सर्व चॅनेलने कलाकारांची दखल घेत त्यांच्या कामनाचे कौतुक केले आले.

आता नुकताच 'फिल्मफेअर अवॉर्ड मराठी २०२२' पार पडला. अनेक मराठी कलाकारांनी या सोहळ्याला उपस्थित होते. ब्लॅक लेडी मिळविण्यासाठी सारेच उत्सुक होते. पण या सोहळ्यात बाजी मारली ती 'गोदावरी' या चित्रपटाने.

Godavari Marathi Movie win the best film award at Filmfare award marathi 2022
Kapil Sharma Post: रामनवमीच्या शुभ दिनी कपिलने केली ही खास गोष्ट, सर्वाचं मन जिंकलं

अभिनेता जितेंद्र जोशी याने सोशल मीडियावर पोस्ट करत 'गोदावरी' चित्रपटाच्या यशाची बातमी शेअर केली आहे. 'गोदावरी' चित्रपटाला १४ नामांकने मिळाली होती. तर 'गोदावरी' चित्रपटाला ५ 'फिल्मफेअर पुरस्कार' मिळाले आहेत.

'गोदावरी' चित्रपटाला फिल्मफेअरमध्ये 'सर्वोत्कृष्ट चित्रपट' म्हणून गौरविण्यात आले आहे. यासह या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पथकथा, सर्वोत्कृष्ट पाश्व संगीत, आणि बेस्ट क्रिटिक अवॉर्ड अभिनेता मिळाला आहे. दिग्दर्शक निखिल महाजन, प्राजक्त देशमुख, ए व्ही प्रफुल्लचंद्र, अभिनेता जितेंद्र जोशी यांना हे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

जितेंद्र जोशीने पोस्ट ही पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, 'गोदावरी चित्रपट पुन्हा जिंकला!! यावेळी फिल्मफेअरमध्ये'. जितेंद्र जोशींच्या या पोस्टवर अभिनेता अभिजीत खांडकेकर याने कमेंट केली आहे. तसेच अनेक नेटकरी जितेंद्रच्या पोस्टवर कमेंट करत संपूर्ण 'गोदावरी' टीमचे अभिनंदन करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com