Punha Jhimma Song: आता होणार ‘पुन्हा झिम्मा’, परदेशात गेलेल्या सात मैत्रिणींची धमाल मस्ती गाण्यातून दिसणार

Marathi Film Song: सोशल मीडियावर ‘झिम्मा २’मधले टायटल साँग रिलीज झालं आहे.
Punha Jhimma Song
Punha Jhimma SongYou Tube

Punha Jhimma Song

२०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा’ने प्रेक्षकांचे मन जिंकले. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. चित्रपटाला घवघवीत यश मिळाल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाच्या सीक्वेलची घोषणा केली. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ येत्या २४ नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. ‘झिम्मा’मध्ये असलेल्या पाच मैत्रिणींचा ग्रुप आता ‘झिम्मा २’ मध्ये आणखीन मोठा झाला आहे. नक्कीच प्रेक्षकांना यामध्ये दुप्पट मनोरंजन मिळणार आहे. नुकतंच सोशल मीडियावर चित्रपटाचं टायटल साँग रिलीज झालं आहे. (Marathi Film)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Punha Jhimma Song
'Tiger 3' मधील सलमान- कतरिनाचे रोमँटिंक गाणं ऐकलंत का?, अरिजीत सिंगच्या 'Ruaan'ने जिंकली प्रेक्षकांची मनं

बायकांच्या मनात काय सुरु असते, याचे उत्तर मिळणे जरा अशक्यच आहे. त्या कधी कशा व्यक्त होतील याचा काही नेम नसतो. अशाच विविध तऱ्हा असणाऱ्या, व्यक्तिमत्वाच्या बायका जेव्हा एकत्र येतात तेव्हा मात्र धम्माल होते. अशीच धमाल प्रेक्षकांना‘झिम्मा २’च्या टायटल साँगमध्ये दिसणार आहे. इंदूच्या वाढदिवसासाठी परदेशात या महिला रियुनियन करीत आहेत. थोडा रंजक, थोडा भावनिक आणि थोडा हटके प्रवास असणाऱ्या या प्रवासाची कथा आपल्याला 'झिम्मा २'च्या टायटल साँगमध्ये दिसणार आहे. (Song)

'पुन्हा झिम्मा' असे ह्या गाण्याचे बोल आहेत. अमितराज यांचे संगीत लाभलेल्या या गाण्याला क्षितिज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केले आहे. तर या भन्नाट गाण्याला वैशाली सामंत आणि अपेक्षा दांडेकर यांच्या एनर्जेटिक आवाजाने चारचाँद लावले आहेत. (Entertainment News)

सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे यांच्यावर हे गाणं चित्रित झालेले आहे. यामध्ये, सिद्धार्थ चांदेकरच्या चेहेऱ्यावरच या चित्रपटातली धमाल कळुन येत आहे.

कलर यल्लो प्रॉडक्शनच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मित 'झिम्मा २'ची सफर २४ नोव्हेंबरला घडणार आहे. (Latest Marathi News)

Punha Jhimma Song
Sayali Sanjeev Upcoming Movie: ‘काहे दिया परदेस’मधली सायली- ऋषीची जोडी पुन्हा एकत्र, ‘या’ चित्रपटातून येणार भेटीला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com