Jayanti 2: कॉलेजमधील रॅगिंग, जातीभेदाचा थरार उलगडणार; 'जयंती २'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

Jayanti 2: कॉलेजमधील रॅगिंग आणि जातीआधारित भेदभावावर भाष्य करणाऱ्या ‘जयंती २’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ऋतुराज वानखेडेसह दमदार कलाकारांची फौज चित्रपटात दिसणार आहे.
Jayanti 2 Marathi Movie
Jayanti 2 Marathi MovieSaam Tv
Published On

Jayanti 2: कॉलेजमध्ये रॅगिंग आणि भेदभावाच्या घटना रोखण्यासाठी अनेक कायदे आणि नियम अस्तित्वात आहेत. मात्र, तरीही विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या छळाला सामोरे जावे लागते. विशेषतः अनुसूचित जाती-जमातींच्या विद्यार्थ्यांना जातीआधारित रॅगिंग आणि भेदभावाचा सामना करावा लागल्याच्या घटना समोर येतात. याच गंभीर विषयावर भाष्य करणारा ‘जयंती २’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रभावी ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला असून, येत्या ११ सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

‘जयंती २’मध्ये चंद्रपूरसारख्या भागातून उच्च शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या पायल या तरुणीची कथा मांडण्यात आली आहे. उच्च शिक्षण घेऊन शेती करण्याचं स्वप्न पायल पाहते. मात्र, कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर तिच्या वाट्याला रॅगिंग आणि भेदभाव येतो. या अन्यायाविरोधात आवाज उठवल्यानंतर तिच्या आयुष्यात संघर्षाला सुरुवात होते. या संघर्षात पायलचं पुढे काय होतं आणि तिला न्याय मिळतो का, याचं उत्तर चित्रपटातून मिळणार आहे.

Jayanti 2 Marathi Movie
Samay Raina Controversy: बिहारी-कश्मीरी विनोद समय रैनाला पडला महागात? भाजप-काँग्रेस नेत्यांनी सुनावले खडेबोल

'जयंती २' या चित्रपटाची निर्मिती मेलिओरिस्ट फिल्म स्टुडिओने केली असून चित्रपटाची कथा, संवाद आणि दिग्दर्शन शैलेश बळीराम नरवाडे यांचे आहे. 'जयंती' चित्रपटाचा प्रमुख चेहरा असलेला अभिनेता ऋतुराज वानखेडे या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारत असून पायल जाधव, अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर, रोहिणी हट्टंगडी, देविका दफ्तरदार, विजय निकम, राजकुमार जरांगे, मानसी सुभाष अशी दमदार कलाकारांची फौज आपल्याला या चित्रपटातून भेटीस येणार आहे. संजीवकुमार हिल्ली यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून संकलन फैसल महाडिक यांचे आहे. डॉ. सुहास अंबादे , सुहास मुंडे आणि सौरभ गुरू यांनी लिहिलेल्या गीतांना ओंकारस्वररूप यांचे संगीत लाभले असून पार्श्वसंगीत मंगेश धाकडे यांचे आहे

Jayanti 2 Marathi Movie
Nepal Flood : नेपाळमध्ये पुराचा हाहाकार! महाराष्ट्रातील ६० नागरिक बेपत्ता, कुठल्या जिल्ह्यातील किती पर्यटक अडकले?
Jayanti 2 Marathi Movie
Manasi Parekh: नेपाळमधील पूरात अडकली, शेवटी...; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला थरारक अनुभ

दरम्यान, २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जयंती’ चित्रपटाने सामाजिक विषयामुळे मोठी चर्चा निर्माण केली होती. आता त्याच पुढच्या पर्वात ‘जयंती २’मधून शिक्षण क्षेत्रातील भेदभाव आणि राजकारणावर भाष्य करण्यात आले आहे. प्रभावी कथानक आणि दमदार कलाकारांमुळे या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com