Janhvi Kapoor earns from Social Media: जान्हवी कपूरने 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जान्हवीचे चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. चित्रपटांमधील तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे तिने बॉलिवूडमध्ये एक प्रतिभावान अभिनेत्री म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. श्रीदेवीची मोठी मुलगी देशातील प्रतिभावान आहे. जान्हवी कपूर इंस्टाग्रामवरही बरीच सक्रिय आहे.
नुकतेच एका मुलाखतीत, जान्हवीने तिच्या इंस्टाग्रामविषयी चर्चा केली आहे. जान्हवी म्हणाली, ती फक्त फन म्हणून सोशल मीडिया वापरते. ती तिच्या स्पॉन्सरला आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करते, जेणेकरून तिला तिचे EMI भरता यावेत.' तसेच तिने इंस्टाग्रामवर बोल्ड फोटो शेअर करत सांगितले की, या प्लॅटफॉर्मवर तुमची उपस्थिती देखील तितकीच आवश्यक आहे. (Actress)
जान्हवी कपूर म्हणाली की, "मी ज्या प्रकारचे चित्रपट करत आहात त्यात एक विशिष्ट बीट आहे. तर सोशल मीडिया खूपच वेगळ्या प्रकारे स्वतःला प्रेसेंट करते आहे. सोशल मीडियावर तुम्ही मला वेगवेगळ्या गेट अपमध्ये पाहू शकता. मी मनीष मल्होत्राच्या साडीत किंवा चित्रपटात कुर्त्यांमध्ये दिसते ते तुमच्यामुळे. पण हे माझे काम आहे, माझी कला आहे.
मला सोशल मीडियाला फारसे गांभीर्याने घ्यायचे नाही. मी फन करण्यासाठी सोशल मीडिया वापरतो. मला असे वाटते जर मी सुंदर दिसले आणि माझ्या फोटोंवर तुम्ही कमेंट केली, तर अनेक ब्रँड माझ्यापर्यंत येतील, त्यामुळे EMI भरण्यासाठी माझी आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक चांगली होईल. (Social Media)
जान्हवी सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या "मिली" चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील तिच्या कामगिरीमुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 'मिली ' चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला, हा मल्याळम चित्रपट "हेलन" चा रिमेक आहे. (Movie)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.