बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानची बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये गणना केली जाते. त्याच्याप्रमाणेच त्याचे भाऊही कायमच बॉलिवूडमध्ये चर्चेत असतात. आज (४ ऑगस्ट) सलमानचा भाऊ अरबाज खानचा वाढदिवस आहे. अरबाजचा आज ५७ वा वाढदिवस आहे. अरबाज अनेकदा त्याच्या चित्रपटांमुळे नाही तर त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. आज अरबाजच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया...
अरबाजने चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेपेक्षा सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिका उत्तम पद्धतीने साकारल्या आहेत. अरबाज खान एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता असून तो एक प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता आहे. 'दरार' चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्याचा पहिला चित्रपट १९९६ मध्ये प्रदर्शित झाला. 'दरार' चित्रपटानंतर अरबाज अनेक चित्रपटांमध्ये दिसला पण त्याला सलमान खानसारखे यश मिळाले नाही. अरबाजने बॉलिवूड, उर्दू, तेलुगू आणि मल्याळम भाषेतील चित्रपटात काम केले आहे. त्यासोबतच त्याने टीव्ही सीरियल आणि वेबसीरीजमध्येही काम केले आहे.
सलमान बॉलिवूडमधील महागडा अभिनेता आहे. पण त्याचा भाऊ अर्थात अरबाजचाही महागड्या अभिनेत्यांमध्ये समावेश होतो. अरबाजच्या कमाईचा आकडाही आश्चर्य वाटावा असाच आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अरबाज खानकडे एकूण संपत्ती ५०० कोटींची आहे. तो एका चित्रपटासाठी १५ ते २० कोटींचे मानधन घेतो. सलमान खान प्रमाणेच अरबाजची संपत्तीही कोट्यवधीत आहे. अरबाज खान केवळ अभिनेताच नसून दिग्दर्शक आणि निर्माता आहे. त्याने आतापर्यंत चार चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यात 'दबंग २', 'दबंग ३', 'डॉली की डोली' आणि 'फियरलेस' चित्रपटाचा समावेश आहे.
२०१९ मध्ये, अरबाजने ZEE5 वरील क्राईम- थ्रिलर ड्रामा, “Poison”मधून ओटीटी क्षेत्रात डेब्यू केले. अरबाजचे स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस आहे. त्याने आपल्या प्रॉडक्शन हाऊसमधून अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अरबाज फॅशनमुळे जितका चर्चेत असतो, तितकाच त्याला महागड्या कारची आवड आहे. अरबाजकडे Toyota Land Cruiser, BMW 7 Series आणि Land Rover Range Rover Vogue सारख्या कार्स आहेत.
अरबाजचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय राहिले आहे. मलायकासोबत लग्न इथपासून त्यांच्या घटस्फोटापर्यंत तो नेहमीच चर्चेच्या अग्रस्थानी राहिला आहे. गेल्या काहीच दिवसांपूर्वी अरबाजने दुसरे लग्न केले. अरबाजने मेकअप आर्टिस्ट शौरा खानशी निकाह केला. तर दुसरीकडे मलायकाचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली आहे. अरबाज आणि शौराची पहिली भेट अभिनेत्याचा आगामी चित्रपट 'पटना शुक्ला'च्या सेटवर झाली. दोघांचेही एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे. त्यांनी २४ डिसेंबर रोजी काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.