Honey Singh Concert: 'ब्लूटूथ किंग' म्हणून लोकप्रिय असलेल्या हनी सिंगने कमबॅक केल्यापासून नेहमीच चर्चेत आहे. कधी त्याच्या वक्तव्यामुळे तरी कधी त्याच्या नव्या गाण्यामुळे सोशल मीडियावर वाद होत आहेत. पण या सर्व परिस्थितीत देखील यो यो चे अनेक चाहते आहेत जे त्याच्या गाण्यांची आणि त्याच्या कॉन्सर्टची वाट पाहतात. सध्या तो त्याच्या 'माय स्टोरी – इंडिया चॅप्टर' या कॉन्सर्टमुळे चर्चेत आहे. पण त्याचा पुणे शो रद्द करण्यात आला आहे.
'ब्लूटूथ किंग' म्हणून लोकप्रिय असलेल्या हनी सिंगने पुण्यातील आपला आगामी कॉन्सर्ट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मूळतः हा कॉन्सर्ट 4 एप्रिल रोजी होणार होता, त्याने ही माहिती आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करुन नवीन तारखांचीही घोषणा केली आहे.
हवामान खात्याने त्या दिवशी मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा दिला होता. चाहत्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आयोजक आणि हनी सिंगने एकत्रितपणे हा कॉन्सर्ट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. हनी सिंगने ही माहिती आपल्या सोशल मीडियावर शेअर करत नव्या तारखेची घोषणा केली आहे. आता हा कॉन्सर्ट 18 एप्रिल रोजी पुण्यात पार पडणार आहे. विशेष म्हणजे, आधीच खरेदी केलेली सर्व तिकिटे या नवीन तारखेसाठी वैध राहणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे.
कॉन्सर्ट आता १८ तारखेला होणार
इन्स्टाग्रामवर हनी सिंगने लिहिले की, सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आपल्या चाहत्यांची सुरक्षा हे माझ्यासाठी महत्वाचे असल्याचे त्याने म्हटले, "कॉन्सर्टची सर्व तिकिटे पूर्णपणे विकली गेली होती, परंतु खराब हवामानामुळे आम्हाला कॉन्सर्टचे वेळापत्रक बदलावे लागले आहे. दोन आठवड्यांत मी पुन्हा पुण्यात परतेन."
पुण्यातील हा कॉन्सर्ट त्याच्या 'माय स्टोरी – इंडिया चॅप्टर' (My Story – India Chapter) या दौऱ्याचा एक भाग आहे. या दौऱ्याचाच एक भाग म्हणून, त्याने यापूर्वीच दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये शो केला आहेत; तसेच लवकरच तो कोलकाता येथेही शो करणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.