Dhurandhar 2 Box Office Collection: आदित्य धर यांच्या 'धुरंधर २: द रिव्हेंज' (Dhurandhar 2: The Revenge) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. या चित्रपटाच्या कमाईमध्ये दिवसेंदिवस वेगाने वाढ होताना दिसत आहे. जरी या चित्रपटाने अद्याप 'पुष्पा २' आणि 'बाहुबली २' यांच्या एकूण कमाईचे (lifetime collection) विक्रम मोडले नसले, तरी 'धुरंधर २' सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवले आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन १६ दिवस उलटले असले तरीही, प्रेक्षकांमधील तोच उत्साह आजही आहे. 'गुड फ्रायडे'च्या दिवशी 'धुरंधर २' ने किती कमाई केली जाणून घेऊयात.
'गुड फ्रायडे'चा 'धुरंधर २' ला किती फायदा झाला?
'सॅकनिल्क' (Sacnilk) च्या एका रिपार्टनुसार, रणवीर सिंगच्या 'धुरंधर २' या चित्रपटाला 'गुड फ्रायडे'च्या सुट्टीचा मोठा फायदा झाला. शुक्रवारी म्हणजे प्रदर्शनाच्या १६ व्या दिवशी या चित्रपटाने २१.५५ कोटींची कमाई केली. चित्रपटाच्या १६ व्या दिवशी, देशभरात एकूण १३,३३० शोजचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, या चित्रपटाने भारतात एकूण १,१४८.५८ कोटींची कमाई केली आहे.
'धुरंधर २': जगभरातील कमाई
'धुरंधर २' ने आतापर्यंत जागतिक स्तरावर एकूण १,५२३.५८ कोटींची कमाई केली आहे. १६ व्या दिवशी, या चित्रपटाने परदेशात ५ कोटींची कमाई केली. यामुळे परदेशातील या चित्रपटाची १६ दिवसांची एकूण कमाई ३७५.०० कोटींवर पोहोचली आहे.
जगभरात सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट
दंगल – २,०७० कोटी
बाहुबली २ – १,७८८ कोटी
पुष्पा २ – १,७४२ कोटी
धुरंधर २ – १,५२४ कोटी
धुरंधर – १,३०७ कोटी
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.