'सनम तेरी कसम'चा हिरो सध्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. त्याचा 'सनम तेरी कसम' चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर आजही राज्य केले आहे. त्याची चित्रपटातील भूमिका चाहत्यांना खूप आवडते. अभिनेता आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केली आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अलिकडेच हर्षवर्धन राणेने (Harshvardhan Rane) विमानातून प्रवास केला. ज्याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
व्हिडीओमध्ये पाहू शकता की, विमानात हर्षवर्धन राणेला पाहून एक चाहती भावुक झाली आहे. तसेच ती ढसाढसा रडताना देखील दिसत आहे. तेव्हा एअर होस्टेस आणि हर्षवर्धन त्या मुलीला शांत करत आहेत. त्यानंतर महिला चाहती आणि हर्षवर्धन यांच्यात संवाद घडला. त्यांच्या गोड संवादाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ती चाहती हर्षवर्धनला म्हणते की, "मला नेहमी प्रश्न पडायचा की लोक एखाद्याला पाहून कसे रडू शकतात, पण आज मला ते कळत आहे. मी खूप आनंदी आहे. म्हणून रडत आहे. मी तीन वर्षांपासून तुमचा फक्त अर्धा चित्रपट पाहिला आहे...तेव्हा पासून तुम्ही मला आवडता." यानंतर हर्षवर्धन राणेने चाहतीच्या डोक्यावर हात ठेवून "देव तुम्हाला आशीर्वाद देवो..." असे म्हटले.
हर्षवर्धनने या व्हिडीओला एक खास कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, "एअरइंडिया फ्लाइटमध्ये जगातील सर्वोत्तम चहा घेतला आणि त्यात एका सुंदर मनाच्या (warmest) प्रवाशाला भेटलो. " हर्षवर्धनच्या या व्हिडीओवर चाहते आणि कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
हर्षवर्धन राणेचा 'सनम तेरी कसम' चित्रपट 7 फेब्रुवारी 2025 रोजी पुन्हा प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रेक्षकांची पुन्हा मनं जिंकली. या चित्रपटात एक सुंदर प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. 'सनम तेरी कसम' चा दुसरा भाग देखील येणार असल्याचे बोले जात आहे. हर्षवर्धन राणे आता लवकरच 'दीवाने की दीवानियत' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.