Govinda Second Marriage: गोविंदा दुसऱ्यांदा लग्न करणार? सुनीताच्या वक्तव्यावर मॅनेजरने केला मोठा खुलासा

Govinda Second Marriage: गोविंदा दुसरं लग्न करणार असल्याचा दावा सुनीता आहुजांनी केला. मात्र, गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी हे दावे फेटाळत दुसऱ्या लग्नाची कोणतीही चर्चा नसल्याचं स्पष्ट केलं.
Govinda Second Marriage
Govinda Second MarriageSaam Tv
Published On

Govinda Second Marriage: बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक नात्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. दोघांच्या नात्याबाबत विविध वक्तव्यं समोर येत आहेत. सुनीता आहुजा यांनी नुकतंच गोविंदा दुसरं लग्न करण्याच्या विचारात असल्याचा दावा केला होता. मात्र, आता गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी हे दावे स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत.

सुनीताने काय केला दावा?

पापाराझींनी रेकॉर्ड केलेल्या एका फोन कॉलमध्ये सुनीता आहुजा राखी सावंतशी बोलताना दिसल्या. या संभाषणादरम्यान सुनीताने गोविंदा पुन्हा लग्न करण्याच्या तयारीत असल्याचं समजल्यामुळे आपण घटस्फोटाचा अर्ज मागे घेतल्याचं सांगितलं. सुनीताच्या या वक्तव्यामुळे गोविंदा आणि त्यांच्या वैवाहिक नात्याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली.

Govinda Second Marriage
Famous Actress Death: सिनेसृष्टीचा तेजस्वी तारा हरपला, ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

गोविंदाच्या मॅनेजरने दावे फेटाळले

‘इंडिया टुडे’शी बोलताना गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी सुनीताच्या दाव्यांवर प्रतिक्रिया दिली. शशी सिन्हा यांनी हे दावे फेटाळून लावले आणि सुनीताने अशी विधाने केल्याचे ऐकून आपल्याला धक्का बसल्याचे सांगितले. "मी हे तुमच्याकडून ऐकत आहे. असं काही नाहीये आणि होणारही नाही. दुसरं लग्न होणार नाहीये. ती त्याची पत्नी आहे आणि तिच्या मनात नक्कीच काहीतरी चालले असेल ज्यामुळे तिने ते दावे केले आहेत," असे ते म्हणाले.

Govinda Second Marriage
Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

शशी सिन्हा म्हणाले, गोविंदा आणि सुनीता हे पती-पत्नी आहेत आणि दुसऱ्या लग्नाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. जर गोविंदाला खरंच सुनीतासोबतचं नातं संपवायचं असतं किंवा दुसरं लग्न करायचं असतं, तर त्याने स्वतः घटस्फोटासाठी अर्ज केला असता, असंही त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com