Famous Actress Death: सिनेसृष्टीचा तेजस्वी तारा हरपला, ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Famous Actress Death: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्रीचे चेन्नईत निधन झाले. सात दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं.
Veteran actress Sowcar Janaki passes away
Veteran actress Sowcar Janaki passes awaySaam Tv
Published On

Famous Actress Death: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेत्री सौकार जानकी यांचे शुक्रवारी, २१ ऑगस्ट रोजी चेन्नईत निधन झाले. वयाच्या ९४ व्या वर्षाी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयोमानानुसार उद्भवलेल्या आरोग्यविषयक समस्यांमुळे त्यांना चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू होते. दुपारी १ वाजून ५९ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सौकार जानकी यांच्या निधनाची माहिती ‘नादिगर संगम’चे अध्यक्ष आणि अभिनेते नासर यांनी दिली. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी चेन्नईतील टेनमपेट येथील सेंटोफ रोडवर व्यवस्था करण्यात आली आहे.

Veteran actress Sowcar Janaki passes away
Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

सात दशकांहून अधिक काळ रुपेरी पडद्यावर राज्य

सौकार जानकी यांचं खरं नाव शंकरमांची जानकी होतं. तब्बल सात दशकांहून अधिक काळ त्यांनी अभिनय क्षेत्रात काम केलं. तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड अशा विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Veteran actress Sowcar Janaki passes away
Govinda: 'तू तिला माझी जागा देणार...'; गोविंदा दुसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ? राखी सावंतसमोर सुनीताने केला मोठा खुलासा

१९५० मध्ये प्रदर्शित झालेल्या तेलुगू चित्रपट ‘शावुकारू’मधून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. याच चित्रपटामुळे त्यांच्या नावापुढे ‘सौकार’ हे नाव जोडलं गेलं. त्यानंतर त्यांनी तमिळ चित्रपटसृष्टीतही आपली वेगळी ओळख निर्माण केली. ‘वलैयापथी’, ‘पुथिया परवई’, ‘इधिर नीचल’, ‘इरु कोडुगल’, ‘थिल्लू मुल्लू’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या.

रंगभूमीवरही गाजवलं नाव

चित्रपटांसोबतच सौकार जानकी यांनी रंगभूमीवरही मोठं योगदान दिलं. त्यांनी ३०० हून अधिक स्टेज शोमध्ये काम केलं होतं. अभिनय क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. २०२२ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com