Girija Oak Video: नॅशनल क्रश गिरिजा ओकला खटकली 'ही' गोष्टी; १३ वर्षांच्या मुलाचं नाव घेत म्हणाली...

Girija Oak Godbole First Reaction After Viral Trend: सध्या गिरिजा ओक गोडबोले खूप जास्त चर्चेत आली आहे. गिरिजा ओकचे फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल ट्रेंडनंतर आता गिरिजाने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Girija Oak Video
Girija Oak VideoSaa Tv
Published On
Summary

गिरिजा ओकचा सोशल मीडियावर फोटो व्हायरल

रातोरात झाली नॅशनल क्रश

व्हायरल होत असलेल्या फोटोंवर गिरिजाची पहिली प्रतिक्रिया

व्हायरल ट्रेंडमध्ये खटकली एक गोष्ट

व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना केली ही विनंती

सोशल मीडियावर रोज काही न काही ट्रेंड सुरु असतो. सध्या सोशल मीडियावर मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओकचे फोटो खूप व्हायरल होत आहे. गिरिजाला सध्या नॅशनल क्रश (Girija Oak National Crush) म्हणून ओळखले जात आहे. तिचा निळ्या रंगाच्या साडीतील फोटो व्हायरल होत आहेत. यावर सोशल मीडियावर जबरदस्त कमेंट्स येताना दिसत आहेत. दरम्यान, या सर्व व्हायरल ट्रेंडमध्ये गिरिजाच्या इमेजलादेखील धक्का लागत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, या सर्व व्हायरल ट्रेंडवर गिरिजा ओकने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Girija Oak Video
Girija Oak: निळ्या साडीत मराठमोळ्या अभिनेत्रीने सोशल मीडियावर घातलाय राडा, नॅशनल क्रश म्हणून का झाली प्रसिद्ध?

गिरिजा ओकने शेअर केला व्हिडिओ (Girija Oak Share Video On National Crush Trend)

गिरिजा ओकने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती चाहत्यांचे आभार मानताना दिसत आहे. परंतु या व्हायरल ट्रेंडमध्ये तिला एक गोष्ट खटकल्याचेही तिने सांगितले आहे. गिरिजाने सांगितले की, अचानक एवढं प्रेम मिळतंय, अनेकांचे फोन मेसेज येतायत. अनेकजण माझे मीम्सदेखील पाठवतायत. हे सर्व खूप जास्त क्रिएटिव्ह आहे, त्यामुळे खूप भारी वाटतंय.

Girija Oak Video
Girija Oak Photos: अभिनेत्री गिरीजा ओकचं नशीब चमकलं, एका रात्रीत बनली 'नॅशनल क्रश'

गिरिजाला खटकली ही गोष्ट

गिरिजाला जरी सोशल मिडियावर खूप प्रेम मिळत असले तरी तिला एक गोष्ट खटकली आहे. गिरिजाने सांगितले की, या व्हायरल फोटोंमध्ये काही फोटो एडिट केलेले आहेत. हे असं होणारच हे मला माहित आहे. काही फोटो एआयच्या माध्यमातून अश्लील बनवले गेले आहेत. अनेकांचे असे अश्लील फोटो व्हायरल होत असतात. मात्र, तुमच्या पोस्टवर क्लिक करावं म्हणून हे केलं जातंय का, याला काही नियम नाहीयेत. परंतु मला एका गोष्टीची भीती वाटतेय की, माझा मुलगा सध्या १३ वर्षांचा आहे. त्याने पुढे भविष्यात हे फोटो पाहिले तर, त्याला माहित असणारे हे खरं नाहीये. हा फोटो एडीट केलाय. मात्र, तरीही हा फोटो व्हायरल होऊ नये असं मला वाटतंय. हे फोटो एडीट करणारे किंवा अपलोड करणारे जरी तुम्ही नसाल तर लाइक्स आणि शेअरच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहचवत असाल तर एकदा विचार करा, असं गिरिजाने म्हटलंय.

Girija Oak Video
Girija Oak Husband: रातोरात स्टार झालेल्या गिरीजा ओकचा नवरा कोण आहे? काय करतो?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com