Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक ही सध्या खूप चर्चेत आली आहे. तिला सोशल मीडियावर खूप जास्त सर्च केलं जातंय.
गिरिजा ओकचा निळ्या साडीतील एक फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोंवर कोण आहे ही महिला, असा प्रश्न विचारला जात आहे.
गिरिजा ओकचा हा फोटो साडेतीन लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. हा फोटो लाखो लोकांनी शेअर केला आहे.
गिरीजा ओक मालिका, चित्रपट, नाटक आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. गिरिजाला नवीन नॅशनल क्रश म्हणूनदेखील ओळखले जात आहे.
गिरीजाने निळ्या साडीत फोटो शेअर केले आहे. ती या साडीत खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या निखळ सौंदर्याने चाहत्यांना वेड लावले आहे.
गिरीजा ओक सध्या एका मुलाखतीमुळे आणि तिच्या थेरपी शेरेपी या वेबसीरीजमुळे चर्चेचा विषय बनली आहे.
गिरीजाला सध्या सोशल मिडिया, ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर सर्वाधिक सर्च केलं जात आहे.
Next: चेहऱ्यावरील ड्रायनेस किंवा पिंपल्स कमी करायचं आहेत? तर 'हा' घरगुती फेसमास्क आठवड्यातून १ वेळा नक्की ट्राय करा