Siddhi Hande
सध्या सोशल मीडियावर रोज काही न काही ट्रेंड होत असते. सध्या इंटरनेटवर मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक चर्चेचा विषय बनली आहे.
गिरीजाला मागील काही दिवसात लाखो लोकांनी सर्च केले आहे. तिचा एक निळ्या साडीतील फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.
गिरिजा ओक ही मराठमोळी अभिनेत्री आहे. तिने मराठीसह हिंदी, कन्नड, तमिळ चित्रपटातही काम केले आहे.
गिरिजाने २०१० साली लज्जा मालिकेत काम केले होते. त्यातील गिरिजाची मानसी ही भूमिका लोकप्रिय झाली होती.
गिरिजाने मुंबईतील ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्समधून बायोटेक्नोलॉजीमध्ये पदवी प्राप्त केली आहे.
गिरिजाने कॉलेजमधूनच अभिनयाला सुरुवात केली. तिने सुरुवातीला जाहिराती आणि थिएटर वर्कशॉपमध्ये भाग घेतला होता.
गिरिजाने आमीर खानच्या तारे जमिन पर या चित्रपटातून डेब्यू केला होता. चित्रपटात तिने जबीं भूमिका साकारली होती. हा तिच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला.
अभिनयापूर्वी गिरिजाने सिंगिंग स्टार या गायनाच्या स्पर्धेतदेखील भाग घेतला होता. ती फायनलपर्यंतदेखील पोहचली होती.
गिरिजाने शाहरुख खानसोबत जवान या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटामुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली.