Gehana Weds Faizan: ‘गंदी बात’ फेम अभिनेत्रीने गुपचुप उरकलं लग्न, ‘या’ व्यक्तीसोबत बांधली लगीनगाठ...

Gehana Vasisth And Faizan Ansari Wedding: अभिनेत्रीने नुकतंच फैजान अन्सारीसोबत लग्न केले आहे. गेहनाने फैझानशी मुस्लिम धर्मानुसार लग्न केले आहे.
Gehana Vasisth And Faizan Ansari Wedding
Gehana Vasisth And Faizan Ansari Wedding Instagram
Published On: 

Gehana Vasisth Nikah: ‘गंदी बात’ फेम अभिनेत्री गेहाना वसिष्ठ नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी आपल्या चित्रपटांमुळे तर कधी आपल्या फोटोंमुळे ती चर्चेत राहते. पण यावेळी ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने नुकतंच फैजान अन्सारीसोबत लग्न केले आहे. गेहनाने फैझानशी मुस्लिम धर्मानुसार लग्न केले आहे.

सध्या या जोडीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गेहना आणि फैजानच्या लग्नाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती त्यांनी दिलेली नाही. या व्हायरल होणाऱ्या फोटोंवर अनेक चाहत्यांनी कमेंटकरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Gehana Vasisth And Faizan Ansari Wedding
Ram Charan To Donate Adipurush Tickets: रणबीर कपूरनंतर राम चरण करणार आदिपुरुष चित्रपटाची तिकिटे दान

गेहना वसिष्ठ नेहमीच सोशल मीडियावर कातिल अंदाजातील फोटो शेअर करत असते. सोबतच ती गेल्या काही दिवसांपुर्वी ‘गंदी बात’सह अनेक वेब शोमध्ये प्रमुख भूमिकेत दिसली होती. तर पती फैजानबद्दल बोलायचे तर, तो सोशल मीडियावर उर्फी जावेद, राखी सावंत सह अनेक अभिनेत्रींना त्यांच्या फॅशनवरून तो ट्रोल करतो. गेहना आणि फैझानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी दोघांनाही ट्रोल केले असून ‘लव्ह जिहाद’ प्रमाणे लग्न केल्याचे बोलत आहेत.

Gehana Vasisth And Faizan Ansari Wedding
HBD Mika Singh: वादाच्या भोवऱ्यात अडकणारा मिका सिंग आहे कोट्यवधींच्या संपत्ती मालक

गेहना आणि फैजान यांची ओळख फार दिवसांपासून आहे. फैजानबद्दल बोलायचे तर, तो नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. अलिकडेच तो ‘ॲमेझॉन मिनी टीव्ही’ वर प्रदर्शित झालेल्या ‘दातेबाजी’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसला होता.

तर गेहनाबद्दल बोलायचे झाल्यास, गेल्या वर्षी ती राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे बरीच चर्चेत होती. तिला त्या प्रकरणात अटक देखील करण्यात आले होते. बिझनेसमन राज कुंद्रासोबत काही काम केल्याच्या आरोपाखाली तिला पोलिसांनी अटक केली होती. राज कुंद्राच्या अटकेनंतर गेहनाने त्याच्या अटकेसाठी स्वत: वाचवले होते. गेहनाने राज कुंद्रा निर्मित ३ चित्रपटांमध्ये देखील काम केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.