Ram Charan To Donate Adipurush Tickets: रणबीर कपूरनंतर राम चरण करणार आदिपुरुष चित्रपटाची तिकिटे दान

Ram Charan Donate Movie Tickets: दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणनेही चित्रपटाची १०००० तिकिटे विकत घ्यायचा निर्णय घेतला आहे.
Ram Charan To Donate Adipurush Tickets: रणबीर कपूरनंतर राम चरण करणार आदिपुरुष चित्रपटाची तिकिटे दान
Published On

Ram Charan Show His Support To Adipurush: 'आदिपुरुष' हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आदिपुरुष सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच तो वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. कधी ट्रेलरमुळे तर कधी कलाकारांमुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. दाक्षिणात्य सुपररस्टार प्रभास आणि क्रिती सेनन या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटावर कोट्यावधी रुपये खर्च झाले आहे.

अनेक कलाकारांनी या चित्रपटाला पाठिंबा दर्शवला आहे. 'द कश्मीर फाइल्स' चित्रपटाचे निर्माते अभिषेक अग्रवाल नंतर आता रणबीर कपूरनेही १०००० तिकिटे स्वयंसेवी संस्थाना दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

Ram Charan To Donate Adipurush Tickets: रणबीर कपूरनंतर राम चरण करणार आदिपुरुष चित्रपटाची तिकिटे दान
Adipurush Advance Booking : प्रदर्शनाआधीच 'आदिपुरुष'ने कमवले हजारो डॉलर्स; KGF Chapter 2 चित्रपटाला टाकले मागे

राम चरणनेही दर्शवला 'आदिपुरुष'ला पाठिंबा

एकीकडे चित्रपटावर अनेकांनी टीका केल्या आहेत तर दुसरीकडे कलाकारांनी या चित्रपटाला पाठिंबा दर्शवला आहे. रणबीर पाठोपाठ आता दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणनेही चित्रपटाची १०००० तिकिटे विकत घ्यायचा निर्णय घेतला आहे.

ही तिकीटे तो अनाथ मुलांना दान करणार आहे. चित्रपट प्रदर्शनाआधीच या चित्रपटाची जोरदार कमाई सुरू आहे. अनेक कलाकारांनी पुढाकार घेऊन अनोख्या पद्धतीने चित्रपटाला पाठिंबा दर्शवला आहे.

रामायण हे सर्वांनीच लहानपणी पाहिले असेलच पण आता रामायणावर आधारित हा चित्रपट सर्वांनी पाहावा यासाठी अनेक कलाकार आग्रही आहेत. चित्रपटावरुन होणारे वाद आणि दुसरीकडे चित्रपटाला मिळणारा पाठिंबा ही खूप चांगली गोष्ट आहे.

Ram Charan To Donate Adipurush Tickets: रणबीर कपूरनंतर राम चरण करणार आदिपुरुष चित्रपटाची तिकिटे दान
Free Tickets Of Adipurush Movie: ही संधी गमावू नका! ‘आदिपुरुष’चे 10 हजार तिकीट फ्रीमध्ये, ‘असा’ करुन घ्या फायदा...

राम चरणनंतर आता 'आदिपुरुष' चित्रपटातील राम म्हणजेच प्रभासही तिकिटे अनाथ मुलांना वाटणार असं म्हटलं जातयं.

आदिपुरुष या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपट १६ जूनला रिलीज होणार आहे. हा चित्रपट देशभरात ६२०० स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाने रिलीज आधीच कोट्यावधींच्या घरात कमाई केली आहे.

आदिपुरुष चित्रपटावरील वाद कायमच

चित्रपटाबद्दल बोलायचे तर चित्रपट अजूनही वादात अडकलेला आहे. चित्रपटाचा नवीन ट्रेलरही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नसल्याचे म्हटले जात आहे. तर रामायण या मालिकेतील सीता म्हणजे दिपीका चिखलीयाने चित्रपटावर ताषेरे ओढले आहेत.

तिने म्हटलयं की,'चित्रपटाचे वीएफएक्स हे खूप ओवरलोडेड आहेत. सीताहरणचा सीनही चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचं म्हटलं जात आहे. त्याचबरोबर दिपिकाने ओम राऊत आणि क्रिती सेननच्या किस प्रकरणावर वक्तव्य केले आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com