Sunny Deol Talks About Seema Haider And Sachin Love Story: ‘काय योग्य, काय अयोग्य हे सर्वांनाच...’, सचिन आणि सीमाच्या लव्हस्टोरीवर सनी देओलची प्रतिक्रिया

Sunny Deol Talks About Seema Haider And Sachin Love Story: सचिन आणि सीमाच्या लव्हस्टोरीची सर्वत्र चर्चा सुरू असताना सनी देओलने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
Sunny Deol Talks About Seema Haider And Sachin Love Story
Sunny Deol Talks About Seema Haider And Sachin Love StorySaam Tv
Published On: 

Sunny Deol On Sachin Seema Haider: सध्या देशभरात ‘गदर २’ची टीम प्रमोशन करण्यामध्ये व्यग्र आहे. ‘गदर २’ची सर्वत्र तुफान चर्चा होत असताना, सीमा हैदर आणि सचिन मीना यांचीही लव्हस्टोरी सध्या सर्वत्र तुफान चर्चेत आहे.

‘गदर २’ आणि सचिन- सीमाच्या प्रेमकहाणीत काही प्रमाणात सारखेपणा आहे. तो म्हणजे, भारतातला प्रियकर आणि पाकिस्तानची प्रियसी. ‘गदर : एक प्रेमकथा’मध्ये सनी देओलने अमिषा पटेलला अर्थात साकिनाला ही अशाच प्रकारे तो पाकिस्तानातुन घेऊन आला होता.

असंच काहीसं घडलंय सीमा आणि सचिनच्या लव्हस्टोरीमध्ये. सचिन आणि सीमाच्या लव्हस्टोरीची सर्वत्र चर्चा सुरू असताना सनी देओलने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

Sunny Deol Talks About Seema Haider And Sachin Love Story
Sunny Deol reaction On Dharmendra Kissing Scene : धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किंसिंग सीनवर मुलगा सनी देओलने मौन सोडले; म्हणाला, "माझे वडील काहीही..."

या सचिन- सीमाच्या प्रश्नावर उत्तर देताना सनी देओल म्हणतो, “प्रत्येकाला आपआपलं खासगी आयुष्य जगून द्यायला हवं. सध्याच्या आधुनिकतेच्या युगात तंत्रज्ञान दिवसेंदिवस विकसित होत आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण एखाद्या ॲपवर एकमेकांना भेटतो. ज्यावेळी एकमेकांचे प्रेम होते, त्यावेळी त्यांना एकमेंकापासून दूर राहायचं नसतं, त्यांना जवळ राहायचं.”

“एकमेकांसोबत ते आयुष्य घालवू इच्छितात. या सर्व गोष्टी होत राहतील. आयुष्य जगण्याचे ती एक पद्धत आहे. त्याकडे आपल्याला अधिक लक्ष द्यायची गरज नाही. त्यांच्यावर टिका करायची कोणती गरज नाही. कारण ते त्यांचं आयुष्य आहे. त्यांना जगू द्या. काय योग्य, काय अनोग्य हे सर्वांनाच ठाऊक आहे.”

Sunny Deol Talks About Seema Haider And Sachin Love Story
Vijay Raghavendra Wife Death : प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर ; ४५ वर्षीय पत्नीचे अकास्मात निधन

गदरचा पहिला भाग तब्बल २२ वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर: एक प्रेमकथा’चे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले होते. सनी देओल, अमिषा पटेल, अमरीश पुरी, लिलेट दुबे यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.

फाळणीवर आधारित असलेल्या चित्रपटात अमिशा पटेलने सकीना तर सनी देओलने तारा सिंहच कॅरेक्टर रंगवलंय. अमरिश पुरी आणि सनी देओल यांच्या डायलॉगमुळे चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले.

‘गदर २’मध्ये प्रमुख भूमिकेत सनी देओल, अमिशा पटेल, उत्कर्ष शर्मा आणि सिमरत कौर हे सेलिब्रिटी दिसत आहे. चित्रपट येत्या ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.